- हुसेन मेमनजव्हार : तालुक्यातील जि.प. डिजिटल शाळा फरळेपाडा या शाळेने वर्ष २०१८-१९ या शैक्षणकि वर्षाचा प्रवेशोत्सव आणि नवगतांचे स्वागतासाठी शाळेतील पहिले पाऊल हा अनोखा उपक्रम राबवून सर्वांचेच लक्ष वेधले आहे.ज्या प्रमाणे एखादी नववधू लग्न करून सासरी येते, त्या घरात कुंकुवाच्या पाऊल ठशांनी तिचा गृहप्रवेश लक्ष्मीच्या पाऊलांनी होतो. तिच्या या पाऊलांना जिव्हाळ्याचा, आत्मीयतेचा, आपलेपणाचा आधार मिळतो व ती नविन घरात, माणसात कधी मिसळते हे तिला पण कळत नाही. हाच धागा पकडून फरळेपाडा शाळेने आगळावेगळा उपक्र म राबवून पहिलीमध्ये प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचे शाळेतील पहिले पाऊल या उपक्र माने शाळेच्या पहिल्या दिवशी गुढी उभारून विद्यार्थी व पालक, ग्रामस्थांसह भव्य मिरवणूक काढुन नव्या विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत केले.विशेष म्हणजे शाळेच्या पहिल्या दिवशी फरळेपाडा शाळेत दाखल करतांना नवीन प्रवेशार्थी विद्यार्थ्यांची ट्रॅक्टर मधून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण शाळेची सजावट करून शाळेच्या प्रवेशद्वारात गुढी उभारून शाळेत पहिले पाऊल टाकतांना कागदावर कुंकवात उजवे पाऊल बुडवून त्यांचे ठसे घेण्यात आले. त्यावर शाळेचे व मुलांचं नाव शाळेत दाखल केल्याची तारीख, टाकून तो कागद लॅमिनेशन करून शाळेत जतन करून ठेवण्यात येणार आहे. ज्या वेळेस तो विद्यार्थी ५ वी पर्यंतचे शाळेतील शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी शाळा सोडेल त्या वेळेस त्याचे शाळेत पडलेले पहिले पाऊल त्याला भेट म्हणून दिले जाईल.येथे पाचवी पर्यंत शिक्षणाची सोय असून पटसंख्या ६२ आहे. या शाळेत नेहमी शिक्षणाबरोबर विविध उपक्र म राबवून वेगवेगळे कार्यक्र म घेतले जात आहेत. या शाळेतून अनेक होतकरु विद्यार्थी उदयास आले आहेत.>या उत्सवपूर्ण प्रवेशामुळे मुलांच्या मनातील भीती झाली नष्ट.या उपक्र मामुळे पालकांना शाळेविषयी जिव्हाळा निर्माण होऊन आपली मुले संस्कारक्षम नागरिक बनविणाºया शाळेत शिक्षण घेतात याचा अभिमान वाटत आहे. मुलांमधील भीती नष्ट होऊन ते आनंदाने शिक्षण प्रवाहात सामावून जातात. या उपक्र माचे दूरगामी फलित म्हणजे तो मोठा झाल्यावर त्याचे शाळेतील पहिले पाऊल आठवण म्हणून मिळते. त्यामुळे शाळेतील शिक्षकांना तो कायम समरणात ठेवत असतोच शिवाय त्याची बांधिलकी वाढते.अशी माहिती फरळेपाडा जि.प. शाळेचे मुख्याध्यापक विजय निमझे आणि सहशिक्षक सुदाम काळे या शिक्षकांनी शाळेतील ‘पहिले पाऊल’ या उपक्रमा विषयी दिली.
फरळेपाडा शाळेतील अनोखे ‘पहिले पाऊल’ उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 1:57 AM