पालघर : मराठा समाजाच्यावतीने पुकारलेल्या जिल्हा बंद आंदोलनाचा परिणाम शहरी भागात जाणवला तर, ग्रामीण भागातील दुकाने, बाजारपेठा सुरू होते. एसटी, रिक्षा सेवा सकाळी सुरू असली तरी आंदोलनकर्त्यांनी त्या बंद केल्याने विद्यार्थी, महिला, लहान मुलांचे खूप हाल झाले. जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार न घडता आंदोलन शांततेत पार पडले.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात मराठा क्र ांतीचे आंदोलक आक्र मक झाल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मुंबई, ठाणे, नवीमुंबई, रायगड, नाशिक, अकोला, सातारा जिल्ह्या सोबत पालघर जिल्ह्यातही बंद घोषित करण्यात आला होता. जिल्ह्यात हा बंद शांततेत पार पडावा यासाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनी खबरदारी घेतली होती.पालघर, बोईसर, नालासोपारा येथे रेल्वे रोको होण्याची शक्यता पाहता पोलिसांनी आंदोलनकर्त्यांशी वेळोवेळी संपर्क साधून त्यांना परावृत्त करण्यात यश मिळविले. पालघर विभागांतर्गत एकूण ९१३ फेऱ्यांपैकी ४३५ फेºया रद्द कराव्या लागल्या त्यामुळे या विभागाचे ७ लाख ५१ हजार ८९१ रु पयांचे नुकसान झाले. पालघर डेपोतील १७४ फेºया पैकी ११३ रद्द झाल्याने १ लाख ३५ हजार ६५४ रु पयांचे, वसई डेपोतील ६१ पैकी १५ फेºया रद्द झाल्याने ६४ हजार ५४४, अर्नाळा डेपोतील १६८ पैकी ४२ फेºया रद्द होऊन १ लाख ८६ हजार २५९, नालासोपारा डेपोतील ८० पैकी ३० फेºया रद्द झाल्याने ८६ हजार १३७ रुपयांचे, जव्हार डेपोतील ६२ फेºयापैकी १२ फेºया रद्द झाल्याने ३९ हजार ६८० रुपयांचे, बोईसर डेपोतील २२५ पैकी २२२ फेºया रद्द झाल्याने २ लाख २८ हजार ६४० रु पयांचे , सफाळे डेपोतील ९३ फेºयांपैकी १ फेरी रद्द होऊन १० हजार ९७६ रुपयांचे नुकसान झाले. मात्र डहाणू डेपोतील ५० पैकी सर्व फेºया सुरू असल्याने या बंदचा परिणाम जाणवला नाही.बोईसरला कडकडीत बंदबोईसर : आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यसरकारला जागे करण्यासाठी सकल मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला बोईसर मध्ये चांगला प्रतिसाद मिळाला बंद१०० टक्के यशस्वी व शांततेत पार पडला. आरक्षणासह इतर अनेक मागण्यांसाठी शांततेने काढलेल्या ५७ मोर्चांची दखल राज्यशासनाने न घेतल्यामुळे आक्र मक झालेल्या मराठा क्रांती मोर्चाने हा बंद पुकारला होता.शहराच्या प्रमुख बाजारपेठा, हॉटेल, तीन व सहा आसनी रिक्षा, एसटी, भाजीपाला व मच्छी मार्केट बंद असल्यांने ऐरवी गजबजलेल्या बोईसरच्या रस्त्यांवर आज शुकशुकाट दिसत होता. सुमारे दोनशे कार्यकर्ते सकाळी रस्त्यावर उतरले होते तर बंदला कुठे गालबोट लागू नये व कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी या करीता बोईसरच्या नाक्यानाक्यावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यांत आला होता.सकाळी तुरळक रिक्षा सुरू होत्या मात्र काही वेळातच त्याही बंद झाल्या त्यामुळे तारापूर एमआयडीसीमध्ये जाणाºयांचे प्रचंड हाल झाले परिणामी काहींना बोईसर रेल्वे स्थानकावरूनच घरचा परतीचा रस्ता धरावा लागला, बोईसरमधील काही शाळा बंद तर काही सुरू होत्या म्हात्र बंदचा फारसा परिणाम तारापूर एमआयडीसीतील उद्योगांवर दिसला नाही परंतु वाहतुकी अभावी काही ठिकाणी कर्मचारी अनुपिस्थत होते.बंद यशस्वी करण्यासाठी मराठा समाजाने केलेली एकजूट मोठया प्रमाणात आज बोईसर मध्ये दिसून आली. दुपारी साडे तीननंतर बंद मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर जनजीवन हळू हळू सुरळीत होत गेले तर या बंदला रिक्षा चालक व मालक संघटना, व्यापारी वर्ग व स्थानिक रहिवाशांनी आमच्या विनंतीस मान देऊन सहकार्य केले व तो शांततेत पार पाडला. याबद्दल मोर्चाच्यावतीने त्यांचे आभार मानले गेले.बंदचा मोखाड्यात परिणाम नाहीमोखाडा : मराठा क्र ांती मोर्चाच्या समन्वयक समितीने पुकारलेल्या Ñ बंदला शहरी भागात मोठा प्रतिसाद मिळाला असला तरी या बंदचा मोखाड्यात परिणाम जाणवलेला नाही बाजारपेठा नेहमी प्रमाणे सुरळीत होत्या. परंतु वाहतुकीवर काही प्रमाणात परिणाम जाणवला लांब पल्ल्याच्या गाड्या बंद राहिल्याने प्रवाशांचा काहीसा हिरमोड झाला त्याचबरोबर बस बंद असल्याने सकाळी चहा आणि वृत्तपत्र हे समीकरण असलेल्यांना आज वृत्तपत्रे मिळाली नाहीत. तसेच मोखाडा शासकीय कार्यालयात सर्वच अधिकारी नाशिक येथून ये-जा करतात परंतु नाशिक शहरासह रस्त्यात रास्त रोको आंदोलने असल्याने पंचायत समिती, कृषी कार्यालय, तहसील कार्यालय, बांधकाम विभाग, वनविभाग, आरोग्य विभागात काहीसा शुकशुकाट पहावयास मिळाला यामुळे शासकीय कामासाठी आलेल्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केलीएसटीचे झाले मोठे नुकसानपालघर, सफाळे, वसई, अर्नाळा, डहाणू, जव्हार, बोईसर, नालासोपारा यापैकी डहाणू वगळता अन्य सात डेपो मधून सुटणाºया गाड्यांच्या ९१३ फेºयांपैकी ४३५ फेºया रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे या विभागाचे ७ लाख ५१ हजार ८९१ रु पयांचे नुकसान झालेपालघर डेपोतील १७४ पैकी ११३ फेºया रद्द होऊन १ लाख ३५ हजार ६५४ रु पयांचे. वसई डेपोतील ६१ पैकी १५ फेºया रद्द होऊन ६४ हजार ५४४ चे नुकसान, अर्नाळा डेपोतील १६८ फेºयां पैकी ४२ रद्द झाल्याने १ लाख ८६ हजार २५९ चे, नालासोपारा डेपोतील ८० पैकी ३० फेºया रद्द होऊन ८६ हजार १३७ चे , जव्हार डेपोतील ६२ पैकी १२ फेºया रद्द होऊन ३९ हजार ६८० चे,बोईसर डेपोतील २२५ पैकी २२२ फेºया रद्द झाल्याने २ लाख २८ हजार ६४० रु , सफाळे डेपोतील ९३ फेºयांपैकी १ फेरी रद्द होऊन १० हजार ९७६ चे नुकसान झाले. तर डहाणू डेपोतील ५० पैकी सर्व फेºया सुरू होत्या त्यामुळे या बंदचा परिणाम जाणवला नाही.मुंबई-अहमदाबाद महामार्ग, मनोर बंदमनोर : आरक्षणाच्या मागणीसाठी आक्र मक झालेल्या मराठा क्रांती मोर्चाने बुधवारी मुंबई अहमदाबाद महामार्ग व मनोर बाजार पेठ कडकडीत बंद ठेवली त्यामुळे लोकांचे व वाहन चालकांचे हाल झाले. मनोर पोलीस ठाण्यातर्फे राज्य राखीव व स्थानिक पोलिसांच्या तुकड्या ठीक ठिकाणी तैनात करण्यात आल्या होत्या. त्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही मनोर गावात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी बस स्थानकाजवळ जमून सरकारचा निषेध केला आरक्षण आमचे हक्ककाचे, नाही कोणाच्या बापाचे अशा घोषणा दिल्यात. आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आता मूक मोर्चा ऐवजी ठोक मोर्चा सुरू रहाणार असे मनोर येथील दिलीप देसाई, डॉ. हरीश रदाळ, विजयानंद शास्त्री, सोमनाथ धनगावकर, विनोद शिंदे यांनी सांगितले. त्या नंतर मनोर पोलीस ठाण्यात जाऊन निवेदन देण्यात आले. बंद सर्वत्र शांततेत पार पडला. कुठे ही अनुचित प्रकार घडला नाही मुंबई अहमदाबाद महामार्गावरील हॉटेल बंद असल्याने प्रवाशांचे व चालकांचे हाल झाले.या बंदला वानगाव, चिंचणी येथील जनतेचा व व्यापारी वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे वाणगाव चिंचणी बाजारपेठ बंद होती. मात्र डहाणू, कासा ,बोर्डी येथे बंदला प्रतिसाद न मिळाल्याने बाजारपेठा वाहतूक सुरु होती.मात्र कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. त्याबद्दल आंदोलकांनी आभार मानले आहेत.
शहरांत कडकडीत तर ग्रामीण भागात बंद नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 11:49 PM