लोकमत न्यूज नेटवर्कवसई : वसई-विरार महापालिका हद्दीत पालिकेने सुरू केलेल्या केंद्रांसोबत पालिका हद्दीतील प्राथमिक आरोग्य केंद्रे व सोबत खाजगी अशा १५ रुग्णालयांत कोविड लसीकरण केंद्रे सुरू करण्यास आयुक्तांनी परवानगी दिल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांच्या वतीने जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी लोकमतला दिली.
वसईतील नागरिकांच्या सोयीसाठी वसई-विरार शहर महानगरपालिकेची लसीकरण केंद्रे, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच शासनाने निश्चित केलेली खाजगी रुग्णालये यामध्ये लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत. १. वरुण इंडस्ट्रीज, वालीव, वसई पूर्व २. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, दिवाणमान तलावाजवळ, वसई पश्चिम ३. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, वसई (सर डी.एम. पेटीट हॉस्पिटल) पारनाका, वसई पश्चिम ४. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, पाटणकर पार्क, नालासोपारा पश्चिम ५. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, मनवेलपाडा रोड, विरार पूर्व ६. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, निदान विराटनगर, ७. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, चंदनसार, साईदत्त अंगणवाडी, विरार पूर्व ८. विजयनगर- तुळिंज रुग्णालय नागीनदासपाडा, नालासोपारा पूर्व ९. जनसेवा हॉस्पिटल वसई पश्चिम १०. विजयालक्ष्मी हॉस्पिटल नालासोपारा ११. गोल्डन पार्क हॉस्पिटल वसई पश्चिम १२. लाइफ केअर हॉस्पिटल नालासोपारा पूर्व, १३. जीवदानी हॉस्पिटल नालासोपारा पूर्व १४. संजीवनी हॉस्पिटल विरार १५. बंदर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल नालासोपारा पश्चिम अशी केंद्रे आहे.
केंद्रांवरही घेता येणार अपॉइंटमेंटनमूद वयोगटातील व्यक्तींना selfregistration.cowin.gov.in या वेबसाइटवर जाऊन प्री-सेल्फ रजिस्ट्रेशन करून अपॉइंटमेंट घेता येईल. तसेच प्रत्यक्ष लसीकरण केंद्रांवर जाऊनही अपॉइंटमेंट घेता येईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.