वाडा : मुंबई वडोदरा व्हाया पनवेल या रस्त्याच्या सर्वेक्षणाचे काम तालुक्यातील निंबवली येथे पोलीस बंदोबस्तात करण्यात येत होते मात्र शेतकºयांनी त्याला विरोध करून आधी नुकसानभरपाईबाबत ठोस निर्णय घ्या आणि नंतरच सवेॅक्षण करा, असे सांगून शेतकºयांनी सवेॅक्षण बंद पाडले.हा महामार्ग वाडा तालुक्यातील केळठण, गोराड व निंबवली या ग्रामपंचायतीच्या हद्दीतून जात असून तो १२० मीटर रूंदीचा आहे. या रस्त्यात निबंवली या गावातील ३० घरे, गोराड ४ घरे, केळठण मधील ६ घरे जाणार असून शेतकरी बेघर होणार आहेत. गावांचे पाणवठे बाधित होणार आहेत. तसेच शेतावर बाजारहाट करण्यासाठी जाणारे मार्ग बंद होऊन शेतकº्यांना लांबचा वळसा घालून जावे लागणार आहे. तसेच शेतक º्यांची शेती दोन भागात विभागली जाणार आहे.प्रशासनाकडून सवेॅक्षणाचे काम मंगळवारी सुरू करण्यात आले असता बाधित शेतकरीही तेथे जमले. त्यांनी संबंधित अधिकारी नायब तहसीलदार विठ्ठल गोसावी व रस्त्याचे प्रकल्प अधिकारी देशमुख, साळुंखे यांना पहिल्यांदा नुकसान भरपाईचे बोला नंतरच सवेॅक्षण करा असे सांगून काम बंद पाडले. यावेळी शेतकºयांनी संबंधित अधिकाºयांना निवेदन दिले. शेतकरी कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष कृष्णा भोईर यांच्यासह बाधित शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. पोलिसांचा मोठा फौजफाटा ठेवण्यात आला होता. परंतु बंदोबस्त चोख असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
वडोदरा रस्त्याचे सर्वेक्षण शेतक-यांनी बंद पाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 1:34 AM