शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

पानेरी बचावसाठी माहिम, वडराईकर सरसावले! एकेकाळची जीवनवाहिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 2:36 AM

माहीम-वडराईकरांचा ‘श्वास’ असलेली पानेरी नदी कारखान्यांचे रासायनिक प्रदूषित पाणी आणि पालघर शहाराच्या सांडपाण्यामुळे काळी-पिवळी पडली असून गुदमरू लागली आहे.

- हितेंन नाईकपालघर : माहीम-वडराईकरांचा ‘श्वास’ असलेली पानेरी नदी कारखान्यांचे रासायनिक प्रदूषित पाणी आणि पालघर शहाराच्या सांडपाण्यामुळे काळी-पिवळी पडली असून गुदमरू लागली आहे. तिला पुनर्जिवित करून शुद्धावस्था प्राप्त करून देण्यासाठी माहीम-वडराईकर आता पेटून उठले असून ठिकठिकाणी बैठका, पथनाट्ये, जनजागृतीच्या माध्यमातून ‘एकीचे बळ’निर्माण केले जात आहे.पूर्वेच्या डोंगरावरून झुळझुळत येणारी आणि छोटे बागायतदार, गरीब मच्छीमारांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पानेरी नदीमुळे अनेक कुटुंबीयांचा उदरिनर्वाह त्यातील स्वच्छ पाणी आणि मच्छीवर चालत होता. परंतु २०-२२ वर्षांपासून संपूर्ण पालघर शहराचे सांडपाणी आणि बिडको, आदी औद्योगिक वसाहती मधून बाहेर फेकले जाणारे प्रदूषित,रासायनिक सांडपाणी पाणेरीत जाऊन ही नदी मरणपंथाला लागली आहे. ह्या आपल्या नदीला पुनर्जिवित करण्यासाठी स्थानिकांनी पानेरी बचाव संघर्ष समितीची स्थापना करून फेब्रुवारी २०१४ साली पालघर तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते.या उपोषणा दरम्यान स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत असल्याचे पहावयास मिळाले होते. हा असंतोष पाहता ह्या प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या पालघर नगर परिषदेने आम्ही आमच्या सांडपाण्यावर प्रक्रि या करण्याची स्वतंत्र व्यवस्था उभारू तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषण करणाºया कंपन्यांवर कारवाई करून जीरो डिस्चार्ज, इटीपी आणि सीइटीपी प्लँट उभारण्या बाबत आदेश देऊन पुढील कार्यवाही ३ महिन्यात करण्याचे आश्वासन दिले होते.त्यावर विश्वास ठेवून तत्कालीन राज्यमंत्री राजेंद्र गावितांच्या उपस्थितीत हे उपोषण मागे घेण्यात आले होते.मात्र ह्याला ५ वर्षाचा कालावधी उलटून गेल्या नंतरही नगरपरिषदेकडून अजूनही स्वतंत्र यंत्रणा उभारली गेली तर नाहीच उलट दुप्पटीने सांडपाणी नदीत सोडले जात असून भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या विळख्यात जखडलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळानेही आजपर्यंत आपला शब्द पाळलेला नाही. तर दुसरीकडे दिवसेंदिवस वाढत चाललेले हे प्रदूषण रोखण्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अनेकदा पत्रव्यवहार करून ही आज पर्यंत पानेरीचे प्रदूषण रोखण्याबाबत एकही बैठक जिल्हाधिकाºयांनी घेतली नसल्याचे पानेरी बचाव संघर्ष समिती प्रमुख निलेश म्हात्रे यांनी लोकमतला सांगितले. माहिममधील पानेरी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आल्या नंतर ग्रामस्थांमधील तीव्र असंतोषाला योग्य दिशा देण्यासाठी माहीम ग्रामस्थांतर्फे वडराई मच्छीमार सहकारी संस्थेच्या आवारात शनिवारी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यात जलनायक म्हणून परिचित असलेले राहुल तिवरेकर आणि पालघर जिल्हा पाणथळ जमीन समितीचे माजी सदस्य प्रा. भूषण भोईर यांनी तिला मार्गदर्शन केले.पानेरी वाचवायची असेल किंवा परिसरातील प्रदूषण थांबवायचे असेल तर बाहेरून कोणी येऊन आपल्याला मदत करेल ही अपेक्षा दूर करून ग्रामस्थांना सर्वप्रकारचे मतभेद टाळून आरपारची लढाई लढावी लागणार असल्याचे मत तिवरेकर ह्यांनी व्यक्त केले. लोकशाही व्यवस्थेतील सर्वात सक्षम अशा ग्रामसभेच्या व्यासपीठाचा वापर करून प्रदूषणाविरुद्ध एकमताने आवाज उठवावाच लागेल असे त्यांनी शेवटी सांगितले. गोदावरी नदी प्रदूषणाविरुद्ध दिलेल्या यशस्वी लढ्याची माहिती देत याअनुषंगाने पानेरी प्रदूषणाविरुद्ध लढा उभारण्याचे आवाहन केले, याबाबत शासनाच्या विविध विभागाकडे दाद मागण्याबरोबरीने प्रदूषणग्रस्त मच्छीमार, शेतकरी, महिला या घटकांच्या स्वतंत्र ग्रामसभा आयोजित करून नंतर एका मोठ्या ग्रामसभेत प्रदूषणाविरुद्ध एकमताने निर्णय घेण्याचे आवाहन तिवरेकर यांनी केले.गावातील तरुणवर्गाने पाणेरी प्रदूषणाविरुद्ध ठिकठिकाणी चावडी बैठका घेऊन केलेल्या जनजागृतीमुळे या गावाच्या अस्तित्वाच्या प्रश्नावर झालेल्या सभेला सुमारे चारशेहून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते.प्रदूषणामागे हात कुणाचा?प्रा. भूषण भोईर यांनी खाडी परिसरात दहा वर्षांपूर्वीच्या आणि आताच्या मच्छीच्या उपलब्धते बाबतची तफावत दाखवून दिली. पानेरीच्या दोन्ही बाजूकडील शेती, बागायती बंद झाल्याने व्यथित झालेल्या शेतकºयांनी आपल्या जमीनी मोठ मोठ्या गृहसंकुल व्यावसायिकांना विकून टाकल्या असून ह्या प्रदूषणामागे भूमाफियांचा हात असण्याची शक्यताही त्यांनी लोकमत पुढे व्यक्त केली. त्यामुळे आपल्या जमिनी विकू नका, असे आवाहन करून शेतीपूरक पर्यायी व्यवसाय सुरू करा असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :pollutionप्रदूषणVasai Virarवसई विरार