मुंबई : वरळी सीफेसजवळील आर. जी. थदानी मार्गावरील खन्ना अपार्टमेंट या इमारतीला नोटीस बजावली असून टेकू लावल्याचे पालिकेने म्हटले आहे.मुंबई महापालिकेच्या जी-दक्षिण विभागाने २८ जुलै रोजी इमारतीला डागडुजीबाबतची नोटीस बजावली आहे. येथे किड्स स्कूल भरत असून, इमारतीत एक दुकान, गॅरेज व चायनिज हॉटेल आहे. तसेच या इमारतीत काही वर्षांपूर्वी शिधावाटप दुकानासह सरकारी कार्यालये होती. काही दिवसांपूर्वी पालिकेचे अधिकारी इमारतीची पाहणी करून गेले असून, इमारतीच्या दर्शनी भागावर नोटीस लावण्यात आली आहे.
वरळीतल्या इमारतीला नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 3:32 AM