वसई : ढोल-ताशाचा गजर, बँण्डबाजा आणि डीजेच्या तालावर बेधुंद नाचत, गुलाल उधळत, फटक्यांची जोरदार आतषबाजी करीत गणपती बाप्पाला भव्य फिरवणुकीने वसईकरांनी निरोप दिला. पावसाने पहाटेपासूनच हजेरी लावली होती. पहाटेपर्यंत विसर्जन सुरु असताना पावसाची रिमझिमसुद्धा सुरुच होती. त्याही परिस्थितीत त्याच उत्साहात बाप्पाला निरोप देण्यात आला. दहा दिवसांपासून होत असलेला बाप्पांच्या जयघोषांसहीत भक्तांनी प्रेमाने केलेल्या अभ्यंग, पंचामृत, धूप, मोदकांचा नैवेद्य असा मनसोक्त पाहुणचार घेऊन गणेशाने गुरुवारी निरोप घेतला.आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना बच्चेकंपनींसह मोठ्यांचेही डोळे पाणावले होते. ’गणपती गेले गावाला, चैन पडेना ना आंम्हाला’, म्हणत गणपती बाप्पा मोरया,पुढल्या वर्षी लवकर या’ अशी मनोभावे आळवणी करत निरोप दिला. वसईत शेवटच्या दिवशी २८५ सार्वजनिक आणि ३ हजार ७३६ घरगुती गणेशाचे विसर्जन करण्यात आले. पावसाने पहाटेच जोरदार हजेरी लावल्याने गणेश फिरवणुकीसाठी तयारी करण्याची धावपळ उडाली होती. गणेश मूर्ती असलेल्या ट्रकवर प्लस्टिक कागद टाकून मूर्ती पावसात भिजू नये याची दक्षता घेण्यात आली होती. दुपारनंतर पावसाचा जोर ओसरला असला तरी रिमझिम मात्र कायम होती. रात्री साडेआठनंतर पावसाचा जोर वाढला होता. काही मिरवणुका अगदी पारंपारिक पद्धतीने निघाल्या होत्या. मिरवणुकीत बेधुंद नाचणारी होती, तशीच मराठमोळ्या पारंपारिक वेशभूषा आणि नाचगाणी असलेल्या मिरवणुकाही होत्या. गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करीत बाप्पाच्या मिरवणुका निघाल्या होत्या. दुपारी एकनंतर मिरवणुका सुरु झाल्या, त्या पहाटे दीड- दोन वाजेपर्यंत सुरुच होत्या. दरम्यान, सुरक्षेसाठी एसपी राऊन स्वत; वसईत तळ ठोकुन होत्या.वाड्यात लाडक्या बाप्पाला निरोपवाडा : वाडा शहर व परिसरातील गावांमधील बाप्पांना वैतरणा नदीत, कुडूस परिसरातील मुर्तींना तानसा नदीत तर त्या त्या गावातील तलावात गणपतींचे विसर्जन करण्यात आले. गणपती विसर्जनावेळी डीजेच्या तालावर भव्य मिरवणूक काढली.३४ बाप्पांचे विसर्जनमनोर : ७८ वर्षांचा मनारेच्या महाराजासहित इतर ४ गणपतींचे वाजत गाजत वैतरणा नदीच्या गणेश कुंडात विसर्जन झाले. मनोरच्या महाराजासहित सार्वजनिक मंडळांचे ९ व घरगुती २५ बाप्पांचे वाजत गाजत विसर्जन करण्यात आले. डहाणूत तारांबळडहाणू तालुक्यातील किनारपट्टी भागात अनंत चतुर्दशीच्या दिवशी लोक बाप्पाला निरोप देत असतानाच रात्रीची वेळ, वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली. त्यातच ऐन समुद्राला भरती आलेली असतानाच तब्बल आठ तास तूफानी पाऊस कोसळला. त्यामुळे लोकांची तारांबळ उडाली. अनेकांच्या घरात पुराचे पाणी शिरले, पुरात घरा बाहेर ठेवलेल्या वस्तु वाहून गेल्या,भाताचे कणगेही वाहून गेले.बोईसरला सव्वाशे गणपतींचे विसर्जनबोईसरचा महाराजा, पंचतत्व सेवा ट्रस्ट, एमआयडीसीचा राजा, दीपक ठाकूर यांचा गणपती वंजारपाड्याचा गणपती शिवसेना व शिवशक्तीप्रणीत रिक्षा युनियनचा गणपती असे मोठ्या गणपतीचे विसर्जन थाटामाटात आणि उत्साहात झाले. सुमारे ७० पोलीस व सात अधिकारी विसर्जनप्रसंगी बंदोबस्तासाठी उपस्थित होते.कोठेही अपघाताचे वृत्त नव्हते.पोलिसी कडक नजर, अनुचित प्रकार नाहीपारोळ : वसई पूर्व भागात गणरायाला भावपूर्ण निरोप दिला, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, च्या सुरात बाप्पाने निरोप घेतला.वसई फाटा, सोपाराफाटा, शिरसाड, खानिवाडे, चांदीप, इ भागातील गणरायाच्या विसर्जनाच्या वेळी पोलिस बंदोबस्त असल्ंयाने कोणताही अनुचित न घडल्याने आंनदाने उत्साहाने बाप्पा ला निरोप देण्यात आला.
बाप्पाचा मिरवणुकीत वरुणराजाची तुफानी हजेरी
By admin | Published: September 17, 2016 1:48 AM