वसई - वसई-विरार उपप्रदेश आता भार्इंदर खाडी मार्गे मुंबई शहराला जोडण्याचा मार्ग े मोकळा झाला आहे. भार्इंदर खाडीवर हलक्या वाहनांसाठी सहा पदरी पूल बांधण्याच्या कामाची निविदा नुकतीच मंगळवारी एमएमआरडी ए प्राधिकरणने प्रसिद्ध केली. वर्ष २०१३ ला या कामाला मंजुरी देण्यात आली होती. सुमारे ११०० कोटी रु पयांचा हा प्रकल्प पुढील दोन वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. तर परिणामी या कामामुळे चक्क वसई ते भार्इंदर अंतर अवघ्या दहा मिनिटांत पार करू शकता येणार आहे.पश्चिम रेल्वे मार्गाने वसई-विरार शहर मुंबईला जोडले गेले असले तरी मात्र वाहन घेऊन मुंबईला जायचे असेल तर महामार्गावरून खाडीला वळसा घालून जावे लागत होते. त्यात भार्इंदरला जरी जायचे असेल तर काशिमिरा महामार्गावरून जावे लागत होते. वसई हून भार्इंदरला रेल्वेने जाण्यासाठी आतापर्यंत केवळ दहा मिनिटे लागत असून महामार्गावरून जाण्यासाठी सुमारे एक ते दीड तास लागत होता.त्यामुळे रस्तामार्गे जाताना नागरिकांचा वेळ आणि इंधनाचा अधिक खर्च होत असे. भार्इंदर-नायगाव दरम्यानचा ब्रिटिशकालीन लोखंडी पूल वापरासाठी देण्याची बरीच वर्षे नागरिकांची मागणी होती, परंतु तो कमकुवत असल्याने त्याला परवानगी मिळाली नाही. त्यामुळे भार्इंदर खाडीवर रेल्वे पुलाला समांतर असा पूल बांधावा, अशी पर्यायी मागणी समोर आली. तत्कालीन नवघर माणिकपूर नगर परिषदेने १०० कोटी रु पये खर्चाच्या पुलाचा प्रस्ताव तत्कालीन एमएमआरडीए अध्यक्ष रत्नाकर गायकवाड यांना सादर केला होता.वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी एम एम आर डीए कडे खाडीवरून वाहनांच्या पुलाच्या मागणीसाठी पाठपुरावा सुरू केला होता. २०१३ मध्ये एमएमआरडीएने या पुलाच्या कामाला मंजुरी दिली होती. मात्र विविध कारणांमुळे पुलाच्या कामाच्या निविदा निघत नव्हत्या. अखेर मंगळवारी एमएमआरडीएने कामाच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. १६ आॅक्टोबर २०१९ पर्यंत निविदेला अंतिम मंजुरी मिळणार आहे. त्यामुळे या पुलासंदर्भातील सर्व प्रक्रि या पूर्ण झाल्या असून आम्ही निविदा प्रसिद्ध केल्याची माहिती प्रकल्प संचालक दिलीप कवठकर यांनी दिली.पाणजू वासीयांना बऱ्यापैकी आनंद : नायगाव व भार्इंदर या दरम्यान असणाºया पाणजू बेटावर जाण्यासाठी फेरीबोट हाच एकमेव पर्याय आहे. पावसाळ्यात बोटीने प्रवास करणे धोक्याचे असते. त्यामुळे पाणजूचे रहिवासी भार्इंदर खाडीवरील जुन्या रेल्वे पुलावरून जीव धोक्यात घालून चालत जातात. भार्इंदर खाडीवरील नव्या पुलाला पाणजू गावात उतार देण्यात आला आहे. त्यामुळे त्याची समस्या दूर झाली आहे. पुलाच्या सर्व प्रक्रि या पूर्ण झाल्या असून निविदा मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. दोन वर्षांत पुलाचे काम पूर्ण होईल.पूल असा जोडणारनायगावला या पुलाला उतार मिळाल्यानंतर तो रिंगरूटला जोडला जाणार आहे. तेथून तो वसईमार्गे विरारच्या नारिंगीपर्यंत जोडला जाणार आहे. नारिंगी ते पालघर तालुक्यातील दातीवरे या खाडीवरील पुलाला मंजुरी मिळाली असल्याने पालघरातील नागरिकांनाही या मार्गाने मुंबई खूपच जवळ पडणार आहे. भार्इंदरला हा पूल नेताजी सुभाषचंद्र मार्गाला जोडून पुढे दिहसरपर्यंत जाणार आहे. यामुळे वसईहून वाहनाने निघालेली व्यक्ती थेट भार्इंदरला १० मिनिटांत आणि तेथून पुढे मुंबईला जाऊ शकणार आहे.
वसई ते भाईंदर १० मिनिटांत, ११०० कोटी रु पयांचा प्रकल्प पुढील दोन वर्षांत पूर्ण होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 12:15 AM