वसई : जिल्ह्याच्या पश्चिम परिसरात सहकार क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेल्या वसई विकास सहकारी बँकेच्या २५ जुलै रोजी झालेल्या निवडणुकीमध्ये बविआ पुरस्कृत समन्वय पॅनेलने सर्वच्या सर्व जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळवले. एकूण १७ जागापैकी १३ जागा बिनविरोध झाल्या अन्य ४ जागासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये समन्वय पॅनलचे चारही उमेदवार विजयी झाले. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, वसई जनता सहकारी बँक या पाठोपाठ वसई विकास सहकारी बँकेतही बहुजन विकास आघाडीने आपली घोडदौड सुरूच ठेवली आहे. बँकेचे माजी अध्यक्ष हेमंत म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली समन्वय पॅनलने १७ जिंकत आपले निर्विवाद वर्चस्व ४ जागासाठी दोन दिवसांपूर्वी मतदान पार पडले. या चारही जागा समन्वय पॅनलच्या पदरात पडल्या. या निवडणुकानंतर आता अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुका होणार आहेत. अध्यक्ष पदाची माळ हेमंत म्हात्रे यांच्या गळ््यात पडण्याची शक्यता आहे. बँकेला सुस्थितीत नेल्याचे कार्य म्हात्रे यांनी यशस्वीरित्या पार पडल्यामुळे आमदार ठाकूर यांची त्यांना प्रथम पसंती मिळण्याची दाट शक्यता आहे. (प्रतिनिधी)
वसई सहकारीवर समन्वयचे वर्चस्व
By admin | Published: July 27, 2015 11:00 PM