शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
4
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
5
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
6
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
7
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
8
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
10
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
11
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
13
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
15
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
16
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
18
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
19
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
20
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका

वसईत परप्रांतीय मजुरांची फुटपाथवरच पथारी; श्रमिक ट्रेन कधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 1:35 AM

महसूल खाते, पोलिसांची दमछाक; सनसिटी मैदानात विदारक चित्र

वसई : लॉकडाऊनमुळे राज्याच्या विविध भागांत अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी सोडण्याची व्यवस्था प्रशासन करीत आहे. एकट्या पालघर जिल्ह्यातूनच आतापर्यंत १७ हजारांहून अधिक मजुरांना गावी पाठवण्यात आलेले आहे. मात्र तरीही अद्यापही असंख्य मजूर अडकून पडलेले असून श्रमिक ट्रेन मिळण्याच्या अपेक्षेने ते कुटुंबकबिल्यासह वसई स्टेशन परिसरात जमा होत आहेत,मात्र गाडी न मिळाल्यामुळे असंख्य मजुरांना कुटुंबीयांसह मैदानात तसेच फुटपाथवरच रात्र काढावी लागत आहे.

वसई-विरार महापालिका हद्दीत तसेच जिल्ह्याच्या विविध भागांत अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना आतापर्यंत परराज्यात विविध ठिकाणी श्रमिक ट्रेनने सोडण्यात आले आहे. ज्या मजुरांना टोकन देण्यात आलेले आहे, अशांनाच सध्या सोडले जात आहे,मात्र तरीही अन्य मजूरही आपापल्या कुटुंबीयांसह गावाकडे जाण्याच्या ओढीने स्टेशनवर जमा होत आहेत. ज्यांना जिल्हा प्रशासन तसेच वसई महसूल यंत्रणा यांचा संदेश आलेला नाही, त्यांनी स्टेशनवर येऊ नये, असे आवाहन करूनही हे कामगार जमा होत आहेत. महसूल प्रशासनाकडून मजुरांना प्रथम वसईच्या सनसिटी मैदानात जमा होण्यास सांगितले जाते.

ट्रेन लागली की, ज्याला संदेश आला आहे अशा मजुरांनाच ट्रेनमध्ये मास्क व सॅनिटाईज करून सुरक्षित अंतर पाळून प्रवेश दिला जातो. केवळ गावी जाण्याच्या आशेने हे मजूर इथल्या फुटपाथवर ठाण मांडून रात्रभर बसलेले असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.वसई तालुक्यात अडकलेल्या व आपल्या गावी, परराज्यात जाण्यासाठी रीतसर महसूल विभागाकडे नोंद केलेल्यांसाठी आरक्षण करून तसे संदेश पाठवले जातात.

सनसिटी भागात फुटपाथवर व रस्त्यावर जमा होऊन रात्र काढणारे शेकडोंच्या संख्येने गोळा झालेले बहुतांश कामगार हे ठाणे, मीरा रोड, भार्इंदर आदी भागातून पोलिसांच्या नजरा व नाकेबंदी चुकवून येत आहेत. तालुक्याबाहेरील कामगार-मजुरांना प्रवेश देऊ नका, अशा सूचना आम्ही पोलिसांना केल्या आहेत. तरीही येथे आलेल्या सर्व मजुरांची अन्नपाण्याची सोय स्वयंसेवी संस्था व महसूल विभाग करीत आहे.- स्वप्निल तांगडे, वसई उपविभागीय अधिकारी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याVasai Virarवसई विरार