वसई : महायुतीच्या आरोपानुसार भ्रष्टाचारी महानगरपालिका असा शिक्का बसलेल्या वसई-विरार महापालिकेतील नऊ प्रभाग समितीअंतर्गत सहा. आयुक्त, अधिकारी-कर्मचाºयांच्या बदल्या किंवा पदोन्नती हा सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे. दरवेळी अनेक सहा. आयुक्त व वरीष्ठ अधिकारी म्हणून क्षमता नसलेल्या कर्मचाºयांना थेट वरिष्ठ पदावर पदोन्नती देण्यात आल्यामुळे कर्मचाºयांमध्ये आधीच नाराजीचा सूर आहे.
नुकतीच लोकसभेची आचारसंहिता संपली असून महापालिकेतील प्रभागवार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या व पदोन्नतीच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान यासाठी मर्जीतील अनेक कर्मचारी-अधिकाºयांनी सत्ताधारी बविआच्या ज्येष्ठ नेते मंडळी व लोकप्रतिनिधींना हाताशी धरून आपल्याला क्रिमपोस्टिंग मिळविण्याचा जोरदार खटाटोप चालविल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगते आहे.
या पार्श्वभूमीवर आधीच महापालिका व त्यांच्या प्रत्येक प्रभागात बेकायदेशीर बांधकाम, बेसुमार भ्रष्टाचार तसेच नुकताच उजागर झालेला २५ ठेकेदारांचा रु. १२२ कोटींचा महाघोटाळा आदी अनेक विषयावर महापालिका प्रशासन व त्यांचे प्रभारी सहा.आयुक्त पालघर पोलिस अधीक्षकांच्या आर्थिक गुन्हे शाखा आणि विरोधकांच्या रडारवर आहेत. परंतु हे जरी सत्य असले तरीही महापालिकेच्या प्रभाग समितीच्या सहा. आयुक्त, अधिकारी आदी विविध कर्मचाऱ्यांच्या बदल्या करणे किंवा त्यांना नियमानुसार पदोन्नती देणे हा सर्वस्वी महापालिका आयुक्तांचा अधिकार असून आयुक्तांनी कोणत्याहीनेते अथवा लोकप्रतिनिधीच्या दबावाला बळी न पडता या बदल्या सेवा ज्येष्ठतेनुसार कराव्यात, अशी मागणीवजा सूचना आता वसई विरारच्या सूज्ञ करदात्या नागरिकांकडून केली जात आहे.
पुन्हा होणार मागील घटनांची पुनरावृत्ती?सत्ताधाºयांनी मर्जीतल्या अधिकाऱ्यांना त्यांच्या मनानुसार बदली अथवा पदोन्नती द्यायची आणि मग त्यांनीच अशा सत्ताधाºयांची अवैैध अथवा नियमबाह्य कामे करून द्यायची अशी मिलीभगत सदैैव सुरू असते त्याचीच पुर्नरावृत्ती यावेळी होईल काय? अशीही चर्चा सध्या रंगते आहे.