वसई : स्वच्छ सर्वेक्षण 2019 अंतर्गत केलेल्या सर्वेक्षणाचा निकाल बुधवारी जाहिर करण्यात आला असून, स्वच्छतेच्या बाबतीत देशातले तिसरे सर्वाधिक चांगली कामगिरी करणारे राज्य होण्याचा मान महाराष्ट्राने मिळवला आहे. या यादीत पहिला क्र मांक छत्तीसगड तर दुसऱ्या क्र मांकावर झारखंड आहे. वसई विरार महानगरपालिका या सर्वेक्षणात देशात ३६ व्या स्थानी आहे.देशातील ४२३७ शहरांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं. २८ दिवस डिजीटल पद्धतीने करण्यात आलेल्या या सर्वेक्षणाचे निकाल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्ली येथे घोषित केले.स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत वसई विरार शहर महानगपालिकेला यंदाचा कचरा मुक्त महापालिका म्हणून राज्यातून तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशभरातून ३६ वा क्र मांक मिळाला आहे. गतवर्षी सर्वेक्षणात पालिका ६७ व्या क्रमांकावर आली होती. वसई विरार महापालिकेचे महापौर रूपेश जाधव यांनी बुधवारी दिल्ली येथे हा पुरस्कार स्वीकारला असून गेल्या पाच वर्षात पालिकेचा स्वच्छ भारत अभियानामधील आलेख वाढत असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.केंद्र शासनातर्फे स्वच्छ भारत अभियान स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या सर्वेक्षणात देशभारीत ४ हजार २३७ शहराचे सर्वेक्षण करण्यात आले होते. ६४ लाख प्रतिसाद आणि ४ कोटी लोकांनी समाजमाध्यमावरून या सर्वेक्षणात भाग घेता होता. या सर्वेक्षणात कचरामुक्त महानगरपालिका म्हणून वसई विरार महानगरपालिकेला महाराष्ट्रातून तिसरा क्रमांक मिळाला आहे. तर स्वच्छ सर्वेक्षणमध्ये संपूर्ण देशभरातून ३६ वा क्रमांक महानगरपालिकेला मिळाला. त्याचा पुरस्कार प्रधान सोहळा आज विज्ञान भवन दिल्ली येथे संपन्न झाला. यावेळी वसई विरार शहर महापालिकेचे महापौर रुपेश जाधव, उपमहापौर प्रकाश रॉड्रिग्ज, तत्कालीन आयुक्त सतीश लोखंडे, पालिका आयुक्त बळीराम पवार, शहर अभियंता माधव जवादे यांनी पालिकेतर्फे पुरस्कार स्वीकारला.महानगरपालिकेचे क्षेत्र ३४६३१ हेक्टर इतके आहे. महानगरपालिकेची लोकसंख्या सद्यस्थीतीत १७ लाखाच्या आसपास आहे. महानगरपालिका निवडून आलेले सदस्य ११५इतके असून ५ स्वीकृत नगरसेवक मिळून १२० सदस्य आहेत. २०१४ साली सुरु झालेल्या स्वच्छ भारत मिशन मध्ये महानगरपालिका प्रत्येक सर्वेक्षणात भाग घेत असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न देखील केलेले आहेत.>गोल्डन बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद२०१७ या वर्षी लोक सहभागातून राबविलेल्या स्वच्छता मोहीमेत २७ हजाराहून अधिक नागरीकांनी भाग घेतला व त्याची नोंद गोल्डन बुक आॅफ वर्ल्ड रेकार्ड मध्ये झाली. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियांना अंतर्गत हगणदारी मुक्त शहर म्हणून गेल्या वर्षी महापालिकेला घोषित करण्यांत आले होते. १० हजार ६०७वैयक्तीक शौचालये बांधली असून ५६४ सामुदायिक शौचालये बांधून पूर्ण झाली आहेत. स्वच्छ भारत अभियांना अंतर्गत आतापर्यंत वसई विरार शहर महानगरपालिकेला २०१६ साली ३५ वा , २०१७ साली १३९ वा क्रमांक, २०१८साली ६१ वा आणि यंदा ३६ वा क्र मांक अशी मानांकने मिळाली आहेत. तसेच यंदा स्वच्छ भारत अभियांना अंतर्गत कचरा मुक्त महापालिका म्हणून राज्यातून तिसरा क्र मांक मिळाला आहे. नागरीकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानेच हे यश मिळाल्याचे महापालिकेने सांगितले.
स्वच्छतेत वसई महापालिका ३६ वी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 11:59 PM