वसई : वसईत दोन दिवसांपासून संततधार पडणाऱ्या पावसाने शुक्र वार रात्रीपासून जोर धरला. पावसाने शनिवारी जोरदार हजेरी लावल्याने दिवसभर वसईत धुमशान सुरू होते. दरम्यान, वसईतील नवघर- माणिकपूर शहरातील बहुतेक सखल भागासह रस्त्यावरही पाणी साचल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले होते.या पावसाचा फटका येथील वाहतुकीवर व वाहनचालकांना बसला. त्यातच शहरातील मुख्य चौक भागातील सिग्नल यंत्रणा बंद झाल्याने येथील कोंडीत अधिकच भर पडली. किंबहुना रस्त्यावर खड्डे व त्यांचे प्रमाण वाढले आहे. मागील दोन दिवसात वसईत सरासरी १५० मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. शुक्रवारी रात्रीपासून ते शनिवारी दिवसभर पडणाºया पावसामुळे पुन्हा एकदा वसई बुडाल्याची स्थिती निर्माण झाली होती. त्यात विजेचा खेळखंडोबा अधूनमधून सुरूच होता. जून-जुलै महिन्यात वसईत पडलेल्या मुसळधार पावसामुळे वसईत पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर काही दिवस पावसाने विश्रांतीही घेतली होती. मात्र आता पुन्हा पावसाचे दमदार आगमन झाले आहे.वसई-विरारमधील अनेक सखल भागात पाणी साचले होते. अनेक इमारतींच्या आवारामध्ये पाणी साचले होते. वसई पश्चिमेकडील माणिकपूर, पार्वती क्र ॉस, चुळणे गाव, उमेळमान, कौल सीटी, साईनगर, डीजी नगर, समतानगर, वसई पूर्व, गोखीवरे, वालीव, औद्योगिक पट्टा, मिठागरे वसाहत, ग्रामीण व पश्चिम पट्टीतही बºयापैकी पाणी भरले होते. नवघर माणिकपूरमध्येही तळमजल्यावरील घरे, दुकानात पाणी शिरले होते.पालिकेतर्फे सक्शन पंपाची सोयया सर्व भागातील पाणी काढण्यासाठी महापालिकेतर्फे सक्शन पंप घेऊन काही पथक फिरताना तुरळक दिसले. तर रस्त्यावरील अनेक सखल भागांतील पाणी हळूहळू काढण्यात आले.
वसई, विरारमध्ये पावसाचे धुमशान, सोसायट्यांमध्ये पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 11:05 PM