शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
4
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
5
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीनचं निराशाजनक लिस्टिंग; मात्र नंतर स्टॉक सुस्साट, पहिल्याच दिवशी अपर सर्किट
6
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
7
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
8
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
9
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
10
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
12
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
13
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
14
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
15
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
16
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
17
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
19
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
20
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..

वसईतील रेशनदुकानदार वेठीस

By admin | Published: June 16, 2016 12:38 AM

शिधापत्रिकाधारकांकडून विविध कागदपत्रांंची पूर्तता करून घेण्याची सक्ती मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर सरकारने एक वर्षांपूर्वीच मागे घेतली असतांनाही आहे. पालघर पुरवठा अधिकाऱ्यांनी

- शशी करपे,  वसईशिधापत्रिकाधारकांकडून विविध कागदपत्रांंची पूर्तता करून घेण्याची सक्ती मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर सरकारने एक वर्षांपूर्वीच मागे घेतली असतांनाही आहे. पालघर पुरवठा अधिकाऱ्यांनी रेशनदुकानदारांवरील ही सक्ती काम ठेऊन तिचे पालन न करणाऱ्या रेशनदुकानदारांना नोटीसा बजावल्याने ते त्रस्त झाले आहेत. राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणीकरणाचा प्रकल्प हाती घेण्यात आला असून त्या अंतर्गत एनआरसीकडून प्राप्त झालेल्या कॅस मध्ये डाटा एन्ट्रीचे काम सुरु आहे. त्यानुसार प्रत्येक रेशनदुकानदारांना संगणीकृत शिधापत्रिकांचे पिंं्रटेड फॉर्म देण्यात आले आहेत. त्यात शिधावाटप पत्रिकेतील कुटुंब प्रमुखासह नोंदवलेल्या नावांची आधार कार्ड, बँकेच्या खात्याचा क्रमांक, आधार कार्ड , गॅस एजन्सी आदींची झेरॉक्स दिल्याशिवाय धान्य देणार नसल्याचे फलक दुकानदारांनी लावले आहेत. त्यावरून दुकानदार आणि ग्राहकांमध्ये खटके उडत आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार, केरोसिन परवानाधारक महासंघाने मुंबईने हायकोर्टात भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारविरोधात जनहित याचिका दाखल केली होती. मुंबई हायकोर्टाने १७ मेबुधवारी २०१६ रोजी रेशनदुकानदारांना अशी माहिती सक्तीने मिळविण्यास मनाई करणारा हुकुम जारी केला आहे. त्याआधी राज्य सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे अवर सचिव कि. गो. ठोसर यांनी २१ मे २०१५ रोजीच पत्रान्वये राज्यातील सर्व तहसिलदारांना आदेश दिले आहेत. त्यात मुंबई हायकोर्टाचा निर्णय लक्षात घेऊन शिधापत्रिकाधारकांकडून माहिती संकलीत करण्याचे काम पूर्णत: ऐच्छिक असून ते करून देणाऱ्या दुकानदारांना प्रत्येक शिधापत्रिकेमागे पाच रुपये मानधन दिले जाणार आहे, त्यानंतर याच विभागाचे अधिकारी म. गि. जोगदंड यांनी हायकोर्टाने रास्तभाव दुकानदारांनी लाभार्थ्यांचे आधार क्रमांक व बँक खाते क्रमांक सिडींगकरीता उपलब्ध न केल्यास त्यांचे प्राधिकार पत्र रद्द करण्यात येऊ नये, अथवा कोटा कमी करण्यात येऊ नये अशा सूचना पत्राद्वआरे दिल्या आहेत. याप्रकरणी हायकोर्टाच्या आदेशाचे पालन होईल अशी दक्षता घ्यावी असेही त्यांनी या पत्रात जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना बजावले होते. असे असतांनाही पालघर जिल्हा पुरवठा विभागातून रेशनदुकानादारांना वारंवार नोटीसा बजावल्या जात आहेत. त्यामध्ये म्हटले आहे की, आपणाकडे सोपविण्यात आलेल्या कामात आपण जाणिवपूर्वक दुर्लक्ष करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला आहे. आपल्या दुकानाशी संलग्न शिधापत्रिकांची संख्या अस्तित्वात राहिलेली नाही. त्यामुळे आपण फॉर्ममधील माहिती भरुन घेतलेली नाही. दरम्यान, आधार सीडिंग करण्यासाठी एका खाजगी एजन्सीला राज्यभरात जिल्हा पातळीवर ठेका देण्यात आला आहे.पालघर जिल्ह्यात एजन्सीकडून कामात दिरंगाई झाल्याने पुरवठा विभागाने थेट रास्तभाव धान्य दुकानदारांना या कामाला जुंपण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.आपण अस्तित्वात नसलेल्या शिधापत्रिकांसाठी दरमहा अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंची उचल करीत आहात, असे म्हणण्यास पुरेसा वाव आहे. यास्तव आपणाविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ अन्वे व इतर अनुषंगिक अधिनियमातील तरतुदीनुसार कारवाई का करण्यात येऊ नये? याबाबतचा खुलासा दोन दिवसात सादर करावा अन्यथा आपणास वरील दोषारोप मान्य आहेत, असे गृहीत धरुन पुढील कायदेशिर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, हायकोर्टाच्या आदेशानंतर वर्षभरापूर्वीच राज्य सरकारने याप्रकरणी सविस्तर लेखी खुलासे केल्यानंतरही पुरवठा अधिकाऱ्यांनी मार्चपासून अशा नोटिसा बजावल्या.