शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध?
2
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
3
६ वर्षांच्या मुलीला माकडांनी बलात्काराची शिकार होण्यापासून वाचवले, जबरदस्ती करणाऱ्या इसमाला फटकावले
4
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
5
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
6
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
7
रेखा झुनझुनवाला यांचे सुपरहिट स्टॉक्स, २०२४ मध्ये दिलाय ८९% परतावा; पाहा कोणते आहेत शेअर्स?
8
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
9
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
10
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
11
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
12
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
14
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
15
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
16
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
17
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
18
सत्यपाल मलिक करणार मविआचा प्रचार; मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची घेतली भेट
19
गुजरातच्या 'गिफ्ट सिटी' सारखे आर्थिक केंद्र आता मुंबईत
20
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...

वसई रोड नव्हे, हे आहे असुविधांचे जंक्शन

By admin | Published: January 22, 2016 2:01 AM

लोकल ट्रेन आणि दिवा-पनवेल मेमूसह पश्चिम, मध्य आणि उत्तर रेल्वेच्या लांबपल्ल्याच्या किमान २५ गाड्यांचा थांबा असलेले वसई रोड रेल्वे स्टेशन पश्चिम रेल्वेवरील मिनी

वसई : लोकल ट्रेन आणि दिवा-पनवेल मेमूसह पश्चिम, मध्य आणि उत्तर रेल्वेच्या लांबपल्ल्याच्या किमान २५ गाड्यांचा थांबा असलेले वसई रोड रेल्वे स्टेशन पश्चिम रेल्वेवरील मिनी जंक्शन मानले जाते. पण, रेल्वेने प्रवाशांना प्राथमिक सुविधा न दिल्याने वसई रोड रेल्वे स्टेशन असुविधांचे महाजंक्शन बनले आहे. वसई रोड रेल्वे स्टेशनवर सात फलाट आहेत. यातील एक ते पाच क्रमांकाच्या फलाटावून लोकल ट्रेनची ये-जा असते. फलाट क्रमांक एकपासून असुविधांचा पाढा सुरु होतो. मुख्य स्टेशनपासून दूरवर असलेला फलाट क्रमांक एकवर वारांगना, गर्दुल्ले, भिकारी, प्रेमी युुगुलांचा वावर असतो. पोलिसांचे त्यांना अभय असल्याने प्रवाशांना त्यांचा त्रास मुकाट्याने सहन करण्याशिवाय पर्याय नसतो. या फलाटावर पंखे, विजेचे दिवे यांची कमतरता आहे. त्यामुळे रात्रीच्या अंधुक प्रकाशात याठिकाणी समाजकंटकांची गैरकृत्ये सुरु असतात.या रेल्वे स्टेशनवरून लोकल आणि लांबपल्ल्यांच्या गाड्या मिळून दिवसाला किमान एक लाख चाळीस हजारांच्या आसपास प्रवासी ये-जा करीत असून त्यातून रेल्वेला दरदिवशी दहा लाखाच्या घरात उत्पन्न मिळते. वसई रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतागृहाची सोय नाही. गैरसोयीच्या वसई रोड रेल्वे परिसरात गेल्या वर्षभरात अपघातात ५५ जणांनी आपला जीव गमावला आहे. फलाट क्रमांक एक हा जंक्शनवरील सर्वात घाणेरडा आणि गैरधंद्याचे आगार असलेला फलाट आहे. फलाट क्रमांक दोन, तीन, चार आणि पाचवरून बहुतांश लोकलची ये-जा आहे. पण, एकाही फलाटावर स्वच्छतागृहाची सोय नाही. फलाट क्रमांक दोन-तीनवर एक स्वच्छतागृह होते. पण, पादचारी पुलाच्या कामामुळे तेही नेस्तनाबूत करण्यात आले. फलाट क्रमांक दोन-तीनवर एक जुनी पाणपोई आहे. पण, अतिशय घाणेरड्या स्थितीत असलेल्या पाणपोईकडे कुणी ढुंकूनसुद्धा पहात नाही. फलाट क्रमांक एकवर एकही कँटीन नाही. फलाट क्रमांक चार व पाचवर देखील कुठल्याही प्राथमिक सुविधा नाहीत. या पाचही फलाटांवरून लोकलची ये-जा असते. चार व पाचवरुन लांबपल्ल्यांच्या गाड्याही सुटतात. याही फलाटांवर स्वच्छतागृह आणि पाणपोई नाही. त्यामुळे लोकलने प्रवास करून थकून भागून आलेल्या प्रवाशांना नैसर्गिक विधी करायची सोय नाही. पिण्याचे पाणी स्टॉलवरून विकत घ्यावे लागते. सध्या रेल्वेने फलाटावर अनेक कामे सुुरु केली आहेत. त्यासाठी रेती, माती, खडीचे फलाटांवरच ढीग लागलेले आहेत. गर्दीच्या वेळी धावपळ करणारे अनेक प्रवासी त्यामुळे पडताना दिसतात. सर्वच फलाटांची उंची कमी असल्याने प्रवाशांना चढ-उतार करताना त्रासदायक होते. सर्वच फलाटांवर पुरेसे पंखे नाहीत. बसायला पुरेशी बाके नाहीत. इंडिकेटरची संख्या देखील अपुरी आहे. फलाट क्रमांक एकवर दोन्ही दिशांना तिकीट खिडक्या आहेत. प्रवासी संख्येच्या मानाने त्या अपुऱ्या आहेत. पश्चिमेला एकच तिकीट खिडकी आहे. त्याठिकाणी चार खिड्क्या आणि पाच एटीव्हीएम मशिन्स आहेत. त्याही कमी पडत असल्याने तिकीटांसाठी लोकांच्या रांगा लागलेल्या दिसतात. फलाट क्रमांक चार, पाच, सहा आणि सातवरून दिवा आणि पनवेल मेमूसह लांबपल्ल्यांच्या पंचवीसहून अधिक गाड्यांची ये-जा आहे. त्या गाड्यांना बराच काळ थांबाही आहे. पण, एकाही फलाटावर स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. गाडीचा वाट पहात असलेल्या प्रवाशांना बसायला पुरेशी बाके नाहीत. फर्स्टक्लासच्या प्रवाशांसाठी विश्रांती कक्ष नाही. लांबपल्लयांच्या गाडया इतक्या मोठ्या प्रमाणावर असताना डब्या दर्शक इंडिकेटर नाहीत. त्यामुळे गाडी आली की डब्या शोधण्यासाठी प्रवाशांना अवजड सामान, मुले, वयस्कर लोकांना घेऊन पळापळ करावी लागते. विशेष म्हणजे सातही फलाटांना अद्याप पूर्णपणे छप्पर बसवण्यात आलेले नाही. त्यामुळे ऊन आणि पावसाळ्यात प्रवाशांची मोठी गैरसोय होते. रेल्वेच्या सर्व स्टेशनला जोडून पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा सबवे कधीच मंजूर झाला आहे. पण, गेल्या दहा वर्षांपासून सवबेचे काम रखडून पडले आहे.