वसई : वाघोली येथे मुख्यमंत्र्यांची प्रतिमा जाळल्याप्रकरणी आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. तसेच आंदोलनात ज्यांचा सहभाग नव्हता अशाही लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्यामुळे जनआंदोलन समितीचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. आंदोलन चिरडण्यासाठी पोलीस राजकीय दबावापोटी काम करीत असल्याचा आरोप समितीने केला आहे. आता आम्ही आमच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलनही करायचे नाही का? असा विचारला आहे. वसई-विरार महापालिकेतून गावे वगळण्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून गावे महापालिकेतच असावी, अशी भूमिका घेतली. त्यामुळे संतप्त झालेल्या जनआंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी वाघोली नाक्यावर मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेचे दहन केले. त्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. गुन्हे दाखल झाल्याची माहिती देऊन पोलीस आंदोलकांना पोलीस ठाण्यावर बोलवित आहेत. ज्यांचा आंदोलनाशी काडीचा संबंध नाही अशा लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याने कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. सरकार गावे वगळे ना आणि शासन आंदोलन करू देईना अशी दंडेली सुरू आहे.
वसई-विरार : गाव बचाव आंदोलकांवर गुन्हे दाखल
By admin | Published: January 28, 2016 2:22 AM