शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
2
"देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा", सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री चंद्राबाबूंना झापले 
3
शिंदे गटातील आमदाराविरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा; हजारोंची गर्दी, काय आहे प्रकरण?
4
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
5
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...
6
प्रसिद्ध अभिनेता झाला शेतकरी, घेतलं १.५ कोटींचं कर्ज; मुलाच्या शाळेबाहेर विकावी लागली भाजी
7
टेस्टमध्ये टी-२० तडका! रोहित-यशस्वी जोडीनं सेट केला 'फास्टर फिफ्टी'चा रेकॉर्ड
8
अमेरिकेचा सीरियावर 'एअरस्ट्राइक'! हल्ल्यात ISIS, अल कायदाच्या ३७ दहशतवाद्यांचा खात्मा
9
संतापजनक! वडिलांची हत्या करून मुलांनी घरातच पुरला मृतदेह; ३० वर्षांनी उघड झालं रहस्य
10
कधीकाळी 75-80 टक्के ख्रिश्चन लोकसंख्या असलेला लेबनॉन मुस्लिम देश कसा बनला? वाचा...
11
'खटाखट'नंतर आता 'धडाधड'ची एन्ट्री...; अंबालातून राहुल-प्रियांका यांचा हल्लाबोल, भाजपवर थेट निशाना
12
१२ दिवसांत हिजबुल्लाहचा गेम फिनिश..पेजर हल्ला ते बंकर स्फोटापर्यंत इस्त्रायलचा तांडव
13
ठरलं! मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणार; म्हणाले, “१२ वाजता या, एकजूट अन् शक्ती दाखवा”
14
विधानसभेआधी धारावीकरांसाठी सरकारची मोठी भेट; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ३८ निर्णय
15
३०० विकेट्स अन् ३००० धावांच्या कॉम्बोसह जड्डूच्या नावे झाला जम्बो रेकॉर्ड
16
सीबीआयचे पुण्यासह देशात ३२ ठिकाणी छापे; तीन शहरातील २६ म्होरक्यांना अटक
17
फायद्याची गोष्ट! आधार कार्ड करता येऊ शकतं लॉक; जाणून घ्या, कसं काम करतं हे भन्नाट फीचर
18
भाजपाची बंडखोरांवर कारवाई! माजी मंत्र्यासह 'या' नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
19
बारामतीच्या महाविद्यालयात विद्यार्थ्याचा कोयत्याने वार करत खून, दुचाकीला कट मारल्याचा 'बदला'
20
सलग २४ व्या दिवशी अपर सर्किट, ₹३३ चा 'हा' शेअर ₹२६०० पार; कोणी शेअर विकणारंच नाही

वसई-विरार पालिका हद्दीत वाढला काेराेनाचा धाेका, नागरिकांकडून नियम पायदळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 9:22 AM

काेराेनाकाळात नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वरुण इंडस्ट्रीत एक हजार बेडच्या काेराेना सेंटरचे उद्घाटन करण्यात आले हाेते.

नालासोपारा : वसई-विरारमध्ये काेराेनाचे नियम पायदळी तुडवले जात आहेत. त्यामुळे महापालिका हद्दीत पुन्हा काेराेनाचे रुग्ण वाढत असून, प्रशासनाची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आयुक्त गंगाथरन डी. यांनी वसईच्या वालीव येथील बंद केलेले काेविड सेंटर शुक्रवारपासून पुन्हा सुरू केले आहे. या ठिकाणी एक हजार बेडची क्षमता आहे, मात्र सुरुवातीला ५०० बेडचीच सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. १० मार्चपासून महापालिका हद्दीत ५१२ काेराेना रुग्णांची नाेंद झाल्याने पालिका प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.  काेराेनाकाळात नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वरुण इंडस्ट्रीत एक हजार बेडच्या काेराेना सेंटरचे उद्घाटन करण्यात आले हाेते. मात्र, काेराेनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर हे सेंटर बंद करण्यात आले हाेते. या ठिकाणी १६ जानेवारीपासून लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले हाेते. पण, मागील १० दिवसांत वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे आयुक्तांनी सुरक्षेच्या दृष्टिकाेनातून बंद केलेले या काेविड सेंटरचे दार पुन्हा उघडले आहे. या ठिकाणी महापालिका आरोग्य विभागाच्या डॉक्टरांची टीम दिवसरात्र तैनात करण्यात आली आहे. आतापर्यंत मनपा हद्दीत ३१ हजार १७१ कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यातील २९ हजार ६९५ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ५७४ रुग्ण उपचार घेत असून ९०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १० मार्चपासून आतापर्यंत ५१२ नवे रुग्ण सापडले असून ३४४ रुग्णांना घरी साेडले आहे, तर दाेन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात काेराेनाची दुसरी लाट सुरू झाल्याचा इशारा केंद्र सरकारने दिला आहे. तसेच महाराष्ट्रात काेराेनापासून बचावासाठी याेग्य काळजी घेतली जात नसल्याचे ताशेरेही ओढले आहेत. त्याला मागील काही दिवसांपासून वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे दुजाेरा मिळत असल्याने राज्यभरात ग्रामीण आणि शहरी भागात विशेष काळजी घेण्याचे आदेश राज्य शासनाने संबंधित यंत्रणांना जारी केले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसVasai Virarवसई विरार