वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या एका रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या १ आॅगस्ट २०१८ रोजी मतदान प्रक्रीया पार पडणार असून मतमोजणी ३ आॅगस्ट २०१८ रोजी होणार आहे. त्यामुळे परिसरामध्ये सोमवार पासूनच आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया यांनी केली.दरम्यान, वसई -विरार शहर महानगरपालिकेतील वार्ड क्र . ९७ मधील एका रिक्त पदाच्या पोटनिवडणुकीसाठी १ आॅगस्ट २०१८ रोजी हे मतदान होत आहे तर ४ जुलै २०१८ पासून नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यास सुरु वात होईल. १ आॅगस्ट २०१८ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. या पोट निवडणुकीची मतमोजणी दि. ३ आॅगस्ट २०१८ रोजी सकाळी १० वा. सुरु होईल. तर निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल असे ही सहारिया यांनी सांगितले. जागा एक असली तरी येथील सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.वसई विरार शहर मनपाच्या नवघर माणिकपूर शहर ‘एच’ प्रभाग समितीत मोडणारा वार्ड क्र मांक ९७ हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे मात्र दोन दशकांपूर्वी वार्ड रचना बदलली आणि येथील जागा सतत बहुजन विकास आघाडीनेच काबीज केली. मात्र, या जागेसाठी शिवसेनेनं नेहमीच चांगली लढत दिली होती.या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे संदीप कृष्णा पाटील हे नगरसेवक होते. मात्र, २२ मार्च २०१८ ला त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले होते. त्यामुळे ही जागा रिक्त झाली असून शिवसेनेने येथे संपर्क वाढविला होता.अखेर तीन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर या रिक्त जागेसाठी आता १ आॅगस्ट ला मतदान होत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस बविआ विरु द्ध शिवसेना असा बहुरंगी सामना बघायला मिळणार आहे.
वसई-विरार महापालिकेत पोटनिवडणूक घोषित!,१ आॅगस्ट ला मतदान तर ३ आॅगस्ट ला मतमोजणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 12:26 AM