शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

वसई-विरार महापालिकेची मुदत संपायला अवघे ११ दिवस बाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 12:06 AM

आयुक्त होणार प्रशासक : सत्ताधाऱ्यांमध्ये धाकधूक

विरार : वसई-विरार शहर महानगरपालिकेची मुदत संपायला अवघे ११ दिवस शिल्लक असून येत्या २८ जून रोजी महापालिका आयुक्त गंगाथरन डी. हे प्रशासकपदाची सूत्रे हाती घेणार आहेत. बेधडक निर्णय घेणारे आयुक्त अशी त्यांची अल्पावधीतच वसई-विरारमध्ये ओळख झाल्यानंतर आता प्रशासक म्हणून नेमणूक झाल्यानंतर त्यांची कार्यपद्धती कशी असेल, याबाबत सत्ताधाऱ्यांमध्ये धाकधूक असून नागरिकांमध्ये मात्र उत्सुकता आहे.धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहिल्याने गंगाथरन डी. यांना कामाचा चांगला अनुभव आहे. आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रामुख्याने वसई-विरार शहर महापालिकेत असलेल्या अनावश्यक खर्चाला त्यांनी कात्री लावली आहे. तसेच सत्ताधाºयांना विश्वासात न घेताच परस्पर निर्णय घेत असल्याने सत्ताधारी आणि आयुक्त यांच्यात आधीच संबंध ताणले गेले आहेत. त्यात प्रशासक पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आयुक्त सत्ताधाºयांना आणखी कोणता दणका देतात, याचे टेन्शन सत्ताधाºयांना आले आहे.आणखी किती घोटाळे बाहेर काढणार?महापालिकेची मुदत २८ जून रोजी संपत आहे. त्यानंतर, प्रशासनाचे सर्व निर्णय हे प्रशासक म्हणून डी. गंगाथरन हे घेणार आहेत. मात्र, निर्णय घेताना त्यांना वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागणार आहे. आधीच आयुक्त हे बेधडक निर्णय घेत असल्याने सत्ताधाºयांचा रोष आहे. त्यात प्रशासक म्हणून नियुक्त झाले की, ते कोणते निर्णय घेतात आणि किती घोटाळे बाहेर काढतात, याकडे वसईकरांचे लक्ष लागले आहे.महासभेबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबितचमहापौर प्रवीण शेट्टी यांनी मध्यंतरी एका निवेदनाद्वारे अंतिम महासभा घेण्याचे आवाहन आयुक्त गंगाथरन यांना केले होते. मात्र, आयुक्तांनी महासभा घेण्यास अद्याप तरी मर्यादा असून योग्य वेळ आल्यावर निर्णय घेऊ, असे सांगून महासभा घेण्यास असमर्थता दाखवली होती. आता महापालिकेची मुदत संपायला ११ दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यात प्रशासक झाल्यानंतर आयुक्तांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.