शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

वसई-विरार बुडाले पाण्यात; पोलिस ठाण्यात पाणीच पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 9:42 AM

पावसाने झोडपले : तीन दिवसांपासून जनजीवन विस्कळीत

लोकमत न्यूज नेटवर्क नालासोपारा : मागील दोन - तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वसई तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाने अक्षरश: झोडपल्याने वसई - विरार आणि नालासोपारा शहर पाण्यात बुडाल्याचे चित्र आहे. जिकडे तिकडे पावसाचे कंबरेच्या वर पाणी साचल्याने नागरिकांसह वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. 

कोट्यवधी रुपये खर्च करून महापालिकेने वसईत अनेक नाले बनविण्यापेक्षा नालासोपारा रेल्वेस्थानकाला लागूनच असलेले गटार १२ ते १५ किलोमीटरवरील नायगाव खाडीपर्यंत नेले असते तर दरवर्षी पावसामुळे होणारे नुकसान वाचले असते. पुरामुळे शहराला वेढा बसला नसता, असे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे. गुरुवारी अतिमुसळधार पाऊस झाल्याने मुंबई - गुजरात महामार्गावर पावसाचे पाणी येऊन बऱ्याच ठिकाणी वाहतूककोंडी झाली. महामार्ग पोलिस अंमलदार व एनएचएआय पथकाने जेसीबीच्या साहाय्याने नाले रुंद करून व डिव्हायडर फोडून महामार्गावरील पाणी नाल्यात सोडल्याचे आणि वाहतूककोंडी दूर केल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल चिंतामण यांनी ‘लोकमत’ला दिली.

सनसिटीत प्रवासी अडकलेवसईच्या सनसिटी परिसरात गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास मोठ्या खासगी बसमधून काही प्रवासी प्रवास करीत होते. साचलेल्या पाण्यात ही बस अचानकपणे बंद पडल्याने २० ते २५ प्रवासी अडकले होते. पालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने जीव सुरक्षा जॅकेट व लाइफ रिंगच्या साहाय्याने त्यांची सुटका केली.

विद्युत पुरवठा बंदअतिवृष्टी चालू असल्यामुळे बऱ्याच भागात पावसाचे पाणी भरले आहे. महावितरणतर्फे उपाययोजना म्हणून ११ डीटीसीएस, काही फिडर पिलर्स, डिस्ट्रिब्युशन बॉक्सेस बंद केले आहेत. पाऊस कमी झाल्यास तातडीने विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे, अशी माहिती अधीक्षक अभियंता संजय खंडारे यांनी दिली.

पोलिस ठाण्यात पाणीच पाणीपश्चिमेकडील नालासोपारा पोलिस ठाण्याला पावसाच्या पाण्याने वेढा घातला आहे. पोलिस ठाण्याच्या अनेक रूममध्ये पावसाचे पाणी शिरल्याने कागदपत्रे भिजली आहेत. तसेच तक्रारदाराला पोलिस ठाण्यात पोहाेचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. पोलिस ठाण्याच्या आवारात गुडघ्याच्या वर पाणी आहे.

टॅग्स :thaneठाणेVasai Virarवसई विरारPoliceपोलिसRainपाऊस