वसई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध बंद आंदोलानामुळे व राज्यातील इतर ठिकाणाहून दुधाच्या गाड्या न आल्याने विरार मधील अमूल दुध संकलन केंद्रातील कामकाज थंडावले होते. पण या बंदचा वसई विरार नालासोपारा या भागात कोणताही परिणाम जाणवला नसल्याने या भागातील सर्व डेअरी वर दूधाची विक्र ी चालू होती.कामण, सातिवली, चांदीप, पारोळ या भागात दूध तबेले असून या ठिकाणी शासनाचे दूध संकलन केंद्र नसल्याने व या तबेल्याचे मालक थेट या डेअरी ला दूध विक्री करीत असल्याने. तसेच ग्रामीण भागातील शेतकरी ही या शहरी भागात जाऊन घरोघरी जाऊन दूध विक्र ी करत असल्याने नागरिकांना दुधाची कमतरता न भासल्याने या संपाचा परिणाम तालुक्यात दिसला नाही. दूध उत्पादनाचा प्रती लिटर खर्च ३५ रूपयांवर गेला असता शेतकऱ्यांनी १५ लिटर दराने दूध का विकायचे? शेतकºयांना या दराने दूध विकणे परवडत नाही त्यामुळे शेतकºयांवर दुध विकण्याची जबरदस्ती कोणी करू शकत नाही. असे ते म्हणाले.> ग्राहकांनी रविवारीच करून ठेवला स्टॉकलोकांना अशी भीती होती की, दुध महाग होईल, मिळणार नाही म्हणून सामान्य नागरिकांनी आधीच दुधाचा साठा करून ठेवला होता. एका वेळी ३ ते ४ लिटर दुध विकत घेतले गेले. मात्र या आंदोलनाचा प्रभाव वसई विरार मध्ये दिसून आला नाही. तसेच विरारच्या अमूल दुध संकलन केंद्राजवळ आंदोलन होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने आधीच तेथे बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
वसई-विरारमध्ये दूध संपाचा परिणाम नाही, दोन दिवस पुरेल एवढा वितरकांकडे आहे साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 2:20 AM