-आशिष राणे
वसई - केंद्र सरकारने अनलोक -5 मध्ये शहरातील बंद असलेली सर्व बार,हॉटेल, रेस्टॉरंट व सर्व प्रकारची खाद्य उपहार गृह यांना मार्गदर्शक नियमावली पाळून उघडण्यास दि.5 ऑक्टोबर पासून मान्यता दिली होती.
त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार मार्फत त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्था,ग्रामीण जिल्हा प्रशासन किंवा महापालिका हद्दीतील सर्व हॉटेल बार यांना राज्य उत्पादक शुल्क आयुक्तांनी मान्यता ही दिली गेली. परंतु वसई विरार शहरांतील सर्व बार हॉटेल्स यांच्या वेळेबाबत काहीही स्पष्ट आदेश नव्हते. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून सर्वत्र संभ्रम निर्माण झाला होता.
दरम्यान वसई विरार महापालिका प्रशासक तथा आयुक्त गंगाथरन डी यांना हॉटेल व बार यांच्या वेळे बाबत काय नियमावली असेल असे लोकमत" ने विचारले असता त्यांनी लागलीच या संभ्रमाबाबत तात्काळ बुधवारी संध्याकाळी वेळेबाबतचा आदेशच काढून हॉटेल व बार आदींना दे धक्का दिला आहे.
दरम्यान पालिका आयुक्त गंगाथरन यांनी आदेशात म्हंटल्यानुसार वसई विरार शहरातील सर्व बार रेस्टॉरंट व हॉटेल्सना दि. 8 आॅक्टोबर पासून 50 टक्के क्षमतेने बार, हॉटेल, फूड दुकाने व उपहारगृह सुरू ठेवण्याला मान्यता दिली असल्याचे स्पष्ट लिहिलं आहे. आणि आता "लोकमत"नी विचारलेल्या प्रश्नांनंतर जागे झालेल्या आयुक्त प्रशासनाने तसे लेखी आदेश काढले असून येथील शहरातील सर्व दुकानें रात्री 10 वाजे पर्यंत सुरू ठेवण्याची मागणी होत असताना आयुक्तांनी फक्त रात्री 9 पर्यँतच वेळ निश्चित केली असल्याने आधीच नाराजी पसरली आहे.
काय आहे आयुक्ताच्या आदेशात
वसई विरार शहरातील बार, हॉटेल, उपहारगृह व फूड कोर्ट 50 टक्के क्षमतेने,सॅनिटाईज, योग्य सुरक्षित अंतर,आदी नियम पाळून सकाळी 7 ते रात्री 9 वाजे पर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त गंगाथरन यांनी काढला आहे.
आयुक्तांच्या आदेशाचे सर्वत्र स्वागत होते असले तरी हॉटेल संघटना मात्र आयुक्तांच्या या निर्णयामुळे थोडी शी नाराजी व्यक्त केली आहे. खरं तर शहरातील हॉटेल, बार, उपहारगृह आदी प्रमाणे दुकानें रात्री किमान 10 वाजे पर्यंत सुरू ठेवण्याला मान्यता द्यावी अशी मागणी व्यापारी संघटनेच्या वतीनं यापूर्वी ही केली गेली मात्र ती नाही मिळाली,
निदान हॉटेल बार उपहार गृह नातरी वेळ वाढवून देण्याची हॉटेल संघटनेची मागणी !
तरीही हॉटेल बार आदींना वेळ वाढवून दिली आणि तशी मान्यता मिळाल्यास मागील 7 महिन्यापासून बंद असलेल्या वसई विरार शहरातील हॉटेल इंडस्ट्री तील व्यापारी ,चालक -मालक कर्मचारी आदींना चालना मिळून हजारो नागरिकांच्या हाताला काम मिळणार असल्याचे वसई तालुका हॉटेल असोसिएशन चे अध्यक्ष प्रकाश हेगडे यांनी लोकमत ला सांगितले.
मागील दोन दिवस झाले शहरांतील हॉटेल बार हे रात्री पर्यँत सुरू असल्याचे समजले, मात्र अजून आपल्या शहरात कोरोना संक्रमण आहे त्यामुळे केंद्र व राज्य सरकारचे कोरोना संबंधित सर्व नियम आणि त्यात वेळ ही महत्त्वाची आहे व ती पाळण्यात यावी आणि आम्ही तसे आदेश काढतोय, तसेच हॉटेल व्यावसायिकांनी बार, हॉटेल व उपहारगृहाचे नियम पाळावे, काही अडचण असल्यास हॉटेल संघटनानी अवश्य प्रशासनाची भेट घ्यावी
- गंगाथरन.डीआयुक्त तथा प्रशासकवसई विरार शहर महापालिका, मुख्यालय