शहरं
Join us  
Trending Stories
1
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
2
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
3
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
4
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
5
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
6
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
8
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
9
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
10
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योग गुरूंनीच सांगितलं...
11
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
12
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
13
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
14
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
15
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
16
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
17
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
19
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
20
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा

अखेर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय होणार वसईत !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 12:17 PM

वसईकरांना दिलासा : तीन मजली इमारत बांधकामाला परवानगी

आशिष राणे

वसई : मागील अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विरार चंदनसार येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) पालघरला स्थलांतरित न करता ते आता वसई पूर्वेच्या गोखिवरे येथे होणार असल्याचे आदेश १६ फेब्रुवारी २०२२  रोजी राज्याच्या गृह विभागाने काढल्याचे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नेमके वसईत होणार की पालघर येथे होणार? याबाबत असलेली शंका आता मिटली आहे. गोखिवरे येथे तीन मजली इमारतीच्या १३ कोटींच्या बांधकामालादेखील  परवानगी मिळाली असून या निर्णयामुळे वसईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. पालघर जिल्हा स्थापना होण्यापूर्वी वसई आणि पालघरच्या नागरिकांना आरटीओच्या विविध कामांसाठी ठाण्यातील उपप्रादेशिक कार्यालयात जावे लागत होते. तर पालघर जिल्ह्याची स्थापना झाल्यानंतर २०१४ नंतर  तात्पुरत्या स्वरुपात विरार पूर्वेच्या चंदनसार येथील भाड्याच्या जागेत हे उपप्रादेशिक कार्यालय सुरू करण्यात आले होते. आता गोखिवरे येथे तीन मजली इमारतही उभारली जाणार असून नागरिकांची कामे लवकर होतील अशी त्यांना अपेक्षा आहे.

१३ कोटी रुपये येणार खर्चगृह विभागाच्या अवर सचिवांनी गोखिवरे येथील जागेत तळमजला अधिक दोन मजल्याच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. या बांधकामाचा एकूण खर्च १३ कोटी रुपये एवढा आहे या जागेत कार्यालयीन इमारत व अद्ययावत वाहने पासिंग व तपासणी प्रमाणपत्र केंद्र तयार केले जाणार आहे.

कुठली कामे होतात आरटीओमध्ये ?शिकाऊ अनुज्ञप्ती, पक्की अनुज्ञप्ती, अनुज्ञप्ती नूतनीकरण, अनुज्ञप्तीची दुय्यम प्रत देणे, इत्यादी कामे तसेच वाहन हस्तांतरण, वाहनास ना हरकत प्रमाणपत्र जारी करणे, वाहन नोंदणी दुय्यम प्रत देणे, कर्जबोजा उतरवणे, चढविणे, प्रमाणपत्र नूतनीकरण व परवानाविषयक कामे या कार्यालयात होतात. या कार्यालयामार्फत दरवर्षी किमान ५० हजारहून अधिक वाहनांची नोंदणी व हजारो वाहनांचे परवाना नूतनीकरण करण्यात येते. 

याअंतर्गत कोणता भाग येतो?या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत वसई तालुक्यासह पालघर, डहाणू, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा, तलासरी आदी भाग येतो. कायमस्वरूपी कार्यालय कुठे असावे. जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या पालघरमध्ये की वसईमध्ये असावे याबाबत  मतभेद होते.  दुसरीकडे मात्र हे कार्यालय शहरापासून लांब असल्याने वाहनधारकांची आणि नागरिकांची गैरसोय होत होती.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसVasai Virarवसई विरार