शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत वादाची ठिणगी; एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार? तर, अजितदादा भाजपच्या बाजूने...
2
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
3
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
4
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
5
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
6
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
7
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
8
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
9
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
10
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
11
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
12
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
13
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
14
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
15
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
16
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
17
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
18
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
19
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
20
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या

वसई पर्यटन विकासासाठी पाच कोटी मिळवून देणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 12:50 AM

मुंबईकरांनी गोव्याला जाण्या ऐवजी गोव्यासारखे सौंदर्य , सागरी किनारे व लज्जतदार जेवण जेथे मिळते त्या वसईतील किनारपट्टीला भेट द्यावी.

पारोळ : मुंबईकरांनी गोव्याला जाण्या ऐवजी गोव्यासारखे सौंदर्य , सागरी किनारे व लज्जतदार जेवण जेथे मिळते त्या वसईतील किनारपट्टीला भेट द्यावी. जे जे गोव्यात आहे तेच इथेही आहे. मात्र पर्यटनाच्या दृष्टीने असणा-या सोयी सुविधा अधिक दर्जेदार करणे महत्वाचे असून त्यासाठी राज्य सरकरकडून पाच कोटींचा निधी मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन, अशी घोषणा पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी रविवारी केली.गेल्या दोन दिवसांपासून वसईच्या निसर्गरम्य अर्नाळा समुद्रकिनारी सुरु असलेल्या अर्नाळा महोत्सवाचे उद्घाटन त्यांनी रविवारी केले. तेव्हा ते बोलत होते.यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस राजन नाईक, वसईचे तहसीलदार किरण सुरवसे, सरपंच हेमलता बाळशी, रामदास मेहेर, जितेंद्र मेहेर, रिसॉर्ट असोसिएशनचे अध्यक्ष महादेव निजाई, भरत भोईर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी वरील मान्यवरांच्या हस्ते अर्नाळ्यातील राष्ट्रीय ज्युनियर चॅम्पियन करणं हेगिस्ते, रणजीपटू विनायक भोईर , उत्कृष्ट शेतकरी भूषण म्हात्रे, ओनील अल्मेडा व मी जागृत बंदरपाडेकर यांचा सत्कार करण्यात आला. हा महोत्सव प्रथमच होत असून अर्नाळ्या मधून नुकतेच निवडून आलेले भाजपा उपसरपंच महेंद्र पाटील यांच्या संकल्पनेतून व ग्रामपंचायत अर्नाळा यांच्या माध्यमातून साकार झाला.दिनांक १७ व १८ फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या या महोत्सवात खवय्यांना आगरी व कोळी पद्धतीचे अत्यंत रु चकर व शारीरिक स्वास्थ्याला उपायकारक पदार्थ खायला मिळाले. त्यासाठी सदर महोत्सवात अनेक स्टॉल लावण्यात आले होते.याच बरोबर येथील संस्कृती, परंपरांचे व राहणीमानाचे दर्शन घडविणारे अनेक कार्यक्र म कलाकारांनी दोन दिवस सादर केलेत. दोन दिवसांच्या या महोत्सवाला नागरिकांनी खूप मोठ्या उपस्थितीत हजेरी लावली होती.ऐतिहासिक वस्तूंच्या संग्रहाचे प्रदर्शनही मांडण्यात आले होते. या प्रदर्शनात शिवकालीन, पोर्तुगीज, पेशवेकालीन ते इंग्रजांच्या काळातील शस्त्रांचा व ऐतिहासिक वस्तूंचा समावेश होता. वसई विकासिनी दृक कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी येथील सागरी किनाºयावर वाळूशिल्प साकारून महोत्सवाला अधिक रंगत आणली होती.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार