नालासोपारा : वसई-विरार शहरात गेल्या ५ महिन्यात ७२ जणांना एचआयव्हीची लागण झाल्याचे उघड झाले आहे. बाधित रु ग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पालिका धास्तावली आहे. त्यांच्या उपचारासाठी वालीव येथील नागरी आरोग्य केंद्रात एआरटीसी कक्ष आता सुरू केले जाणार आहे.या रोगाबाबत जनजागृती केली जात असतानाही शहरात बाधित रु ग्णांची संख्या वाढत आहे. ही गंभीर बाब असून मागील ५ महिन्यात शहतात तब्बल ७२ रु ग्णांची नोंद पालिकेच्या रु ग्णालयात झालेली आहे. जिल्हा एडस नियंत्रण संस्थेने पालिकेला एचआयव्ही कक्षासाठी विनामूल्य औषधे देण्याचे मान्य केले आहेत. वसई पुर्वेच्या वालीव येथील नागरी आरोग्य केंद्रात यासाठी एआरटीसी कक्ष उभारण्यात येणार आहे. याबाबत पालिकेचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ राजेंद्र चौहान यांनी सांगितले की, आमच्या कडे आलेल्या क्षयरु ग्णांची तसेच गरोदर मातांची आम्ही तपासणी करत असतो. त्यात हे रु ग्ण आढळल्याची माहिती जानेवारीत १८, फेब्रूवारीत १२, मार्च मध्ये १४ एप्रिल मध्ये ९ आणि मे महिन्यात १९ एचआयव्ही बाधीत रु ग्णांची नोद करण्यात आली आहे.एआरटीसी म्हणजे अॅटी रॅट्रोव्हायरल थेरेपी सेंटरएआरटीसी म्हणजे अॅटी रॅट्रोव्हायरल थेरेपी सेंटर.या सेंटरमध्ये एचआयव्ही बाधीत रु ग्णांना विशिष्ट औषधे घ्यावी लागतात. ती औषधे घेतल्यानंतर त्याचा परिणाम कसा होतो हे पाहण्यासाठी नियमति तपासण्या कराव्या लागतात. या तपासण्या एआरटी सेंटर मध्ये होतात. याबाबच माहिती देताना एडस रोगावर काम करणाऱ्या कृपा फाऊंडेशनच्या अमित पटेल यांनी लोकमतला सविस्तर माहिती दिली.ते म्हणाले की, एचआयव्ही बाधीत रुग्णांसाठी लागणारी औषधे महाग असतात. साधारण रु ग्णाला २ ते ३ हजारांचा खर्च येतो. जी औषधे आयÞुष्यभर घ्यायची असतात. मीरा रोडच्या इंदिरा गांधी रु ग्णालयात ही औषधे मिळतात. मात्र गेल्या ८ महिन्यात वैद्यकीय अधिकारी नाही. त्यामुळे वसईच्या रु ग्णांना केईएम जेजे, नायर किंववा ठाण्याच्या सिव्हील रु ग्णालय. कृपा फाऊंडेशन मध्ये ही औषधे मिळतात. ही औषधे तपासणी करावी लागते.त्याचे परिणाम तपासण्यासाठी सीडी ४ आणि व्हायरल लोड या चाचण्या कराव्या लागतात. त्याने एचआयव्हीचं प्रमाण किती असते हे समजते. नियमित तपासणी या केंद्रात होते. वजन वाढलं, कमी झाले हे तपासण्यासाठी दर ६ महिन्यांनी सीडी ४ चाचणी करावी लागली त्यानुसार औषधांचे प्रमाण बदलावे लागते. कालांतराने व्हायर शरीरात बदल करतो. त्यामुळ औषधे बदलावी लागतात. वसईत केवळ कृपा फाऊंडेशन मध्ये हे केंद्र आहे.
वसईत ७२ एचआयव्ही रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 1:05 AM