नालासोपारा : उशीराने येत असलेली वीजदेयके व अवाजवी देयकांमूळे वसईकर पुरते बेजार झालेले आहेत. सदोष मीटर महावितरण बदलून देत नाही, मात्र वाढीव आलेली बिले अगोदर भरा व मग तक्रार करा असे म्हणणाऱ्या महावितरण विरोधात आता नाराजीचे सुर उमटू लागले आहेत.महावितरणचे राज्यभरात ९ झोन असून वसई -विरार शहराचा कल्याण झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. वसईत एकूण दोन उपविभाग आहेत. त्यात वसई गाव, वसई शहर पुर्व व पश्चिम तसेच वाडा यांचा समावेश होतो. तर दुसºया नालासोपारा विभागात नालासोपारा पूर्व, पश्चिम आणि आचोळा यांचा समावेश होतो. वसई विभागात दोन लाख चाळीस हजार ग्राहक तर नालासोपारा विभागात सव्वा पाच लाख ग्राहक आहेत. यातील हजारो ग्राहक वीज मीटर सदोष असण्याची व वाढीव वीजबिले येत असल्याची तक्र ार वारंवार महावितरण कार्यालयात करीत असतात. केवळ विरारमध्येच १२ हजारांहून अधिक मीटर सदोष असल्याची माहिती अधिकारातून उघड झाले आहे.वसई विरार शहरातील वीज ग्राहक सद्या भरमसाठ वाढीव वीज देयकांमूळे त्रस्त झालेले आहेत. गेल्या काही वर्षांपासून ग्राहकांना वापरापेक्षा अधिक वीज देयके येत असतात. त्यामूळे सर्वसामान्य ग्राहक हवालिदल झाला आहे. सदोष मीटरमुळे ही वाढीव व भरमसाठ वीज देयके ग्राहकांच्या माथी मारली जात आहेत. याबाबत माहिती अधिकाराखाली चरण भट यांनी शहरात सदोष वीज मीटर किती आहेत याबाबत माहिती मागवली असता, फक्त विरार शहरातील सदोष मीटरबाबतच्या आकड्यांची माहिती समोर आली आहे. २०१४ पासून अवाजवी वीज देयकांची समस्या सुरू आहे. महावितरणाने दिलेल्या माहितीनुसार विरार पूर्व शहरात १२ हजार ८१७ वीजमिटर सदोष असल्याचे सांगण्यात आले. याचा अर्थ या बारा हजार ग्राहकांना चुकीची वीज देयके महावितरणाकडून पाठवण्यात येत आहेत. ही आकडेवारी फक्त विरार शहराची असून नालासोपारा व वसई शहरातील लाखो वीज ग्राहकांचीही हिच समस्या आहे. ज्या कंपनीची ही सदोष मीटर लावलेली आहेत त्यांना नियमानुसार दंड आकारणे आवश्यक आहे. मात्र, तरीही महावितरणाने कुठलाही दंड कंपनीला आकारलेला नाही. उलट ग्राहकांना अवाजवी बील भरण्याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. वीज मीटर उपलब्धतेनुसार बदलण्याचे काम सुरू आहे. एवढेच त्रोटक उत्तर महावितरणाच्या अधिकाºयांकडून देण्यात येते.ग्राहकांना कोट्यवधीचा फटकामागणी नसतानाही २०१३-१४ मध्ये ग्राहकांची जुनी वीज मीटर बदलून फ्लॅश कंपनीची चार लाख मीटर बसविण्यात आले होती. तक्र ारी वाढल्यानंतर दुसºया कंपनीची मिटर बदलण्यात येऊन पुन्हा लावण्यात आली. मात्र परिस्थिती बदलली नाही.या सर्व कंपन्यांचे निर्माते एकच असून वेगवेगळ्या नावाने ते उत्पादन करत सदोष मीटर बसवत होते. अवाजवी वीज बिलांचा मुद्दा पेटल्यावर २६ जुलै २०१६ रोजी अधिक्षक अभीयंत्यांनी वीजमीटर बदलली जातील असे आश्वासन दिले होते.
चुकीच्या वीजबिलांमुळे वसईकरांची होते लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 10:51 PM