वसई: तहसील कचेरीतून दंडात्मक नोटीसा बजावून सुरु करण्यात आलेल्या वसुलीविरोधात वसईतील विविध पक्षांनी आंदोलन सुरु केले आहे. भाजपाने धरणे धरून विरोध केला. तर बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकांनी निदर्शने केली. महसूल खात्याने मार्च अखेरपर्यंत महसूल वसुलीचे ८० कोटी रुपयांचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी महसूल खात्याने कारखानदारांना शेड वाढवल्याप्रकरणी नोटीसा बजावल्या आहेत. त्यात काही हजारांपासून ते लाख रुपयांपर्यंत दंड भरण्यास सांगितले आहे. त्यामुळे वसई औद्योगिक पट््यातील कारखानदारांमध्ये तीव्र Þअसंतोष पसरला आहे. याप्रकरणी इंडस्ट्ीयल फेडरेशनचे अध्यक्ष राजीव पाटील यांनी तहसीलदारांची भेट घेतली होती. मात्र, तहसीलदारांनी कारखानदारांवर कारवाई करण्याची भूमिका कायम ठेवली आहे. दुसरीकडे, बिनशेती वापर करून उभ्या करण्यात आलेल्या हजारो बिल्डींग आणि चाळींनाही दंडात्मक कारवाईच्या नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे नागरीकांमध्ये असंतोष खदखदू लागला आहे. तहसिलदारांची कारवाई बेकायदा असल्याचा आरोप करून भाजपाने तहसील कचेरीसमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन केले होते. महसूल विभागाच्या वसुलीविरोधात बहुजन विकास आघाडीही आक्रमक झाली आहे. शुक्रवारी महासभा संपल्यानंतर महापौर प्रविणा ठाकूर यांनी सर्व नगरसेवकांची बैठक घेतली होती. या बैठकीत नगरसेवकांनी महसूल खात्याच्या कारवाईमुळे कारखानदार आणि नागरीक त्रस्त झाल्याचा आरोप केला. वसुलीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपही काही नगरसेवकांनी केला. तहसिलदारांकडून वसुली थांबवण्यात आली नाही तर आंदोलन छेडण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. तसेच कुणीही दंड भरू नये, असे आवाहनही या बैठकीत करण्यात आले. दरम्यान, बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक सुनील आचोळकर, लॉरेन डायस यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी तहसीलवर निदर्शने करण्यात आली. यावेळी तहसीलदारांना एकवीस प्रश्नावली सादर केली. या प्रश्नांची उत्तरे द्या, मगच वसुली करा असेही तहसिलदारांना सांगण्यात आले. (प्रतिनिधी)महसूल अधिकाऱ्यांच्या विरोधात भाजपाचे धरणे -वसई: वसईच्या निवासी नायब तहसीलदार स्मिता गुरव यांनी अधिकाराचा गैरवापर करून वसई मंडळातील उद्योजक ,कारखानदार , कंपन्यां व सामान्य नागरिकांना अव्वाच्या सव्वा रकमेच्या बेकायदेशीर नोटिसा बजावून कारखाने व कंपन्यांना सील ठोकून त्या बंद करत असल्याच्या विराधात भाजप जिल्हा सचिव राजेंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली १७ मार्च रोजी सकाळी १० वाजता एक दिवसीय धरणे धरण्यात आले. यावेळी शेकडो आंदोलनकर्ते चिमाजी अप्पा मैदानापासून पायी चालत हातात निषेधाचे फलक व निषेधाच्या घोषणा देत तहसील कार्यालयासमोर पोहचले. ज्यांच्या विरोधात हे आंदोलन छेडण्यात आले होते त्या नायब तहसीलदार स्मिता गुरव या रजेवर असल्याने दुपारी तीन नंतर प्रांत अधिकारी क्षीरसागर व आंदोलन कर्त्यांचे शिष्टमंडळ यांची भेट झाली . प्रांत अधिकाऱ्यांनी मागण्या मान्य करून निकषाप्रमाणे कारवाईचे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. जिल्हा अध्यक्ष सुभाष साटम, सरचिटणीस राजन नाईक ,हरेंद्र पाटील, शेखर धुरी,सुनील किणी प्रीती म्हात्रे,अस्थाना ,चौबे ,महेंद्र पाटील आदी उपस्थित होते . (प्रतिनिधी)
महसूलविरोधात वसईत असंतोष
By admin | Published: March 21, 2017 1:33 AM