पारोळ : वसईत खत टंचाई निर्माण झाली असून पडणाऱ्या पावसात भातरोपांची वाढ होण्यासाठी खताची मात्रा देणे आवश्यक असते. पण खताचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून खत लवकर उपलब्ध व्हावे, अशी मागणी त्यांनी कृषी विभागाकडे केली आहे.वसई तालुक्याच्या पूर्व भागातील भात शेतीच्या पेरण्याची रोपे वीतभर वाढली असून त्यांना पहिली मात्रा लागणा-या खतांमधील युरिया कृषी सेवा केंद्रांवर उपलब्ध नसल्याने शेतक-यांमध्ये रोष पसरला आहे. एक तर पाऊस उशिरा सुरु झाला. त्यात कशाबशा पेरण्या आटोपल्या. त्यांची रोपे आता शेतात डोलू लागली असून काही ठिकाणी वीतभर वाढ झालेली आहे. अशावेळी रोपांना वाढीसाठी अत्यंत आवश्यक असणारे युरिया हे खत योग्य वेळी दिले गेले नाही तर पुढील येणाºया भात पिकावर त्याचा विपरीत परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही, असे शेतकरी सांगत आहेत . मागील गुरूवारपासून बरसणाºया वरूणराजाने काहीशी उसंत घेतल्याने. दिवसभर मिळालेल्या पावसाच्या उघडीपीमुळे जोरदार पावसामुळे खोळंबून राहिलेली शेतीची कामे करण्याची लगबग शेतकºयांमध्ये दिसून येत आहे. या कामाचाच एक भाग म्हणजे वाढ होत असलेल्या रोपांना अधिक सक्षम करण्यासाठी युरियाची मात्रा शिफारशीप्रमाणे द्यावी लागते. मात्र नेमक्यावेळी युरिया मिळत नसल्याने शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत कृषी सेवा केंद्र चालकांनी सांगितल की, आम्ही मिळणाºया खतासाठी शुल्क केव्हाच भरले असून अजूनही फर्टिलायझरकडून आम्हाला पुरवठा करण्यात आलेला नाही. तर तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही .
वसईत खताची टंचाई, शेतकरी त्रस्त, कृषीखाते सुस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2019 12:34 AM