शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

वसईला सूर्याचे १०० एमएलडी!

By admin | Published: January 01, 2017 3:53 AM

अनेक अडथळ्यांची शर्यत पार करणाऱ्या सूर्या पाणी योजनेने आता गती घेतली असून येत्या तीन महिन्यात वसई विरारला मुबलक पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे

- शशी करपे,  वसईअनेक अडथळ्यांची शर्यत पार करणाऱ्या सूर्या पाणी योजनेने आता गती घेतली असून येत्या तीन महिन्यात वसई विरारला मुबलक पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे येत्या नवीन वर्षापासून वसईकरांची तीव्र पाणी टंचाई दूर होणार आहे. वसईकरांची पाणी टंचाई दूर करण्यासाठी १०० एमएलडी सूर्या पाणी पुरवठा योजनेला मंजूरी मिळाली होती. २०१४ मध्ये योजनेच्या कामाला सुरुवात करण्यात आली. या योजनेतून १ मार्च २०१५ पर्यंत १०० एमएलडी पाणी पुरवठा सुरु होणार होता. याच प्रश्नावर सत्ताधारी बहुजन विकास आघाडीने वसई विरार महापालिकेत पुन्हा एकदा निर्विवाद सत्ता हस्तगत केली होती. परंतु वनखात्याने खोडा घातल्यानंतर ही योजना रखडून पडली होती. महापालिका निवडणुकीनंतर सहा महिन्या पाणी आणू, अशी घोषणा सत्ताधारी बहुजन विकास आघाडीने केली खरी पण, दीडवर्षे उलटून गेल्यानंतरही पाणी पुरवठा सुुरु न झाल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आरोपांच्या फैरी झाडायला सुुरुवात केली होती. मात्र, नव्या वर्षात या योजनेच्या कामाला गती देऊन येत्या तीन महिन्यात पाणी पुरवठा करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. ही योजना तीनशे कोटींची आहे. मात्र, कामाला सुरुवात झाल्यापासून अनेक अडथळे येऊ लागले आहेत. या योजनेतील जलवाहिन्या वनखात्याच्या १९ किलोमीटरच्या जागेतून जाणार आहेत. याठिकाणी ११०० झाडे असल्याने वनखात्याने आक्षेप घेतला होता. महापालिका प्रशासनाने प्रयत्न करून वनखात्याला रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे पर्यायी जमीन मिळवून दिली. त्यानंतर वनखात्याने ना हरकत प्रमाणपत्र दिले होते. त्यातच यातील काही क्षेत्र संरक्षित वने अंतर्गत राखीव असल्याने हरित लवादाने त्याला आक्षेप घेतल्याने काम पुन्हा रखडून पडले होते. यातील याचिकाकर्त्या शोभा फडणवीस यांना लवादाने पक्षकार म्हणून घेतले होते. लवादाने सुनावणी घेतल्यानंतर वनखात्याला ना हरकत प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश दिले होते. मंत्रालयात प्रमाणपत्र सादर झाल्यानंतर लवादाने कामाला हिरवा कंदील दाखवला होता. वनखात्याने पोलादपूरच्या १५ एकर जागेचा सातबारा नावावर झाल्याशिवाय या मार्गातील झाडे कापणार नाही, अशी भूमिका घेतली १५ एकर जागेपैकी काही जागेचा सातबारा वनखात्याच्या नावावर झाला आहे. उर्वरित सातबारा येत्या दोन-तीन दिवसात नावावर होणार असल्याची माहिती शहर अभियंत्यांनी दिली.११०० झाडे कापण्यासाठी महापालिकेने वनखात्याकडे १ कोटी रुपये यापूर्वीच जमा केले आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सातबारा नावावर झाल्यानंतर वनखात्याकडून झाडे कापण्यास सुरुवात केली जाणार आहे. त्यानंतर त्याजागेतून जलवाहिन्या टाकण्यास सुरुवात होणार आहे. वाहिन्या टाकण्याचे काम दोन ते अडीच महिन्यांत पूर्ण होईल. त्यामुळे येत्या तीन महिन्यात वसईकरांना आणखी १००एमएलडी पाणी पुरवठा सुरु होईल. सध्या वसईकरांना सूर्या योजनेतून १०० एमएलडी, उसगाव धरणातून २० एमएलडी, पेल्हार धरणातून १० एमएलडी आणि पापडखिंंड धरणातून १ एमएलडी मिळून दररोज १३१ एमएलडी पाणी पुरवठा केला जातो. त्यात आता आणखी १०० एमएलडी पाण्याची भर पडणार आहे. अशी माहिती महापालिकेचे शहर अभियंता माधव जवादे यांनी दिली.