शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
3
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
4
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
7
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
8
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
9
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
10
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
11
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
12
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
13
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
14
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
15
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
16
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
17
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
18
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
19
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
20
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा

विक्रमगडमध्ये लाभले जखमी फ्लेमिंगोला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 2:23 AM

विक्रमगड-ओंदे येथील रहीवासी ज्ञानेश्वर भगवान जाधव यांच्या शेतामध्ये सायंकाळच्या सुमारास युरोप-सायबेरिया या भागातील फ्लेमिंगो हा पक्षी जखमी अवस्थेत

विक्रमगड : विक्रमगड-ओंदे येथील रहीवासी ज्ञानेश्वर भगवान जाधव यांच्या शेतामध्ये सायंकाळच्या सुमारास युरोप-सायबेरिया या भागातील फ्लेमिंगो हा पक्षी जखमी अवस्थेत सापडला असून त्यांनी पक्षीमित्र दिलीप नारायण खुताडे यांच्या मदतीने भर पावसामध्ये ३ कि़ मी़ चा प्रवास करुन त्याला वनक्षेत्र कार्यालयाच्या स्वाधीन केले़ येथील वनरक्षक अधिकाऱ्यांनी त्यांला एका उब देणा-यापेटीत ठेऊन त्याची रात्रभर काळजी घेतली व जखमेवर मलमपटटी करुन त्यास खाद्य दिले़ आज या पक्षास येथील अधिकारी ठाणे-मुंबई येथील खाडीत सोडणार असल्याचे सांगितले़या दोघांच्या धडपडीमुळे या जखमी फ्लेमिंगोला जीवनदान लाभले आहे. मात्र यावेळी सायंकाळ असून या पाहुण्या पक्षालां पाहाण्याकरीता परिसरातील लोकांनी गर्दी केली होती व आपल्या मोबाईल व कॅमे-यामध्ये या पक्षाचे चित्रीकरण करून व फोटो काढून घेतले़ हे पक्षी पावसाळयामध्ये समुद्रसपाटीच्या भागामध्ये युरोपीयन देशातून भारतातील पाणथळ भागात आणि खाडी परीसरात स्थलांतर करीत असताात. त्यांच्या बरोबर इतर लोसी, आईबीस व अन्य पक्षीही स्थलांतरीत होत असतात. या भागामध्ये पावसाळयात दलदलीचा प्रदेश वाढल्याने त्यात आढळणाऱ्या वनस्पती शेवाळे व छोटे मासे अतिशय प्रिय असल्याने हे पक्षी या परीसरात येत असतात. सध्या हे पक्षी वसई, नालासासेपारा, विरार, भाईंदर या खाडी किना-यावर दिसत आहेत़ परंतु तो जखमी कसा झाला? या प्रश्नाचे उत्तर मात्र मिळालेले नाही.