शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
4
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
5
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
6
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
7
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
8
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
9
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
11
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
13
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
14
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
16
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
17
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
18
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
19
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा

सीओंसाठी विक्रमगडला उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 2:09 AM

जानेवारीपासून सुरु झालेलेल्या विक्रमगडच्या नगरपंचायतीला गेल्या चार महिन्यांपासून मुख्याधिकारी न लाभल्याने तो तातडीने नेमला जावा यासाठी नगराध्य

- लोकमत न्यूज नेटवर्कविक्रमगड : जानेवारीपासून सुरु झालेलेल्या विक्रमगडच्या नगरपंचायतीला गेल्या चार महिन्यांपासून मुख्याधिकारी न लाभल्याने तो तातडीने नेमला जावा यासाठी नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवक मंगळवारपासून उपोषणाला बसणार आहेत. आदिवासी विकासमंत्री व पालकमंत्री विष्णू सवरा यांचा हा मतदारसंघ असल्याने तिथल्याच नगरपंचायतीचा गेले ५ महिने बोजवारा उडाला तरी ते धृतराष्ट्र का झाले आहेत, असा प्रश्न सगळ्या जिल्ह्याला पडला आहे.सवरा हे अत्यंत स्वार्थी राजकारणी आहेत. वाडा पंचायततील भाजपची सत्ता टिकावी आणि मतदारांनी शिवसेनेचे शांताराम मोरे यांना विजयी केल्याची शिक्षा मतदारांना मिळावी यासाठी त्यांनी वाडा ग्रामपंचायतीची नगरपंचायत होऊ दिली नाही.तर विक्रमगड येथील नगरपंचायतीत निलेश सांबरे प्रणीत आघाडीची सत्ता आल्याने व भाजपाचा दारूण पराभव झाल्याने त्यांनी या पंचायतीला मुख्याधिकारीच लाभू दिलेला नाही. त्यात ससेहोलपट नागरिकांची होते आहे. विकास कामे सोडा दैनंदिन कारभारही करता येणे शक्य झालेले नाही. विष्णू सवरा यांचा हा मतदार संघ असल्याने त्यांचेकडे लेखी निवेदने सादर केली आहेत़ मात्र त्याची काडीमात्र दखल घेतली जात नसल्याने तसेच विक्रमगड बाजरपेठेमध्ये गटारिंच्या व रस्त्यांच्या दुतर्फा दुकाना समोर भाजीवाले,फळविक्रेते,व अन्य दुकानदारांनी आपली दुकाने थाटुन अतिक्रमण केलेले आहे़ टप-या टाकलेल्या आहेत त्यामुळे अतिक्रमण हटविणे बाबत आणि मोठी पाणी पुरवठा योजना मंजुर करणे या मागण्या घेवुन आज तहसिलदार कार्यालयासमोर उपोषणास बसून न्या मागणार आहेत़ ़विक्रमगडच्या मुख्य बाजारपेठेमधील गटारीवर गटारीच्या बाहेर टप-या टाकून व्यवसाय करणारे,भाजी, फळ विक्रेत्यांनी दुकाने थाटल्याने मोठयाप्रमाणावर ट्रॅफीक जॅम होते,त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे़ तर गेल्या अनेक वर्षापासून नव्या फिल्टर योजनेचा प्रस्ताव धूळखात पडलेला आहे़ त्यामुळे आजही येथील ग्रामस्थांना गढूळ पाणी प्यावे लागत असल्याने े आरोग्यचा प्रश्न निर्माण झाला आहे़ या विरोधात नगरपंचायत एकवटली आहे.अशी आहे अवस्थानवनिर्मित विक्रमगड नगरपंचायतीचा कार्यभार जव्हार नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे आहे़ मात्र ते ही येथे एखादी दुसरी फेरी मारुन कारभार करीत असल्याने पंचक्रोशीतील नागरिकांची मोठया प्रमाणावर गैरसोय होते आहे.मंत्री सवरा नॉट रिचेबलसवरा यांच्याशी संपूर्ण दिवसभर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो यशस्वी झाला नाही. ते राष्ट्रपतीपदाच्या मतदानासाठी गेल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.ही तर मतदारांना शिक्षाया नगरपंचायतीत शहरवासीयांनी विरोधकांना सत्ता प्रदान केली. त्याची शिक्षा पालकमंत्री आपलाच मतदारसंघ असलेल्या शहरातील जनतेला जाणूनबुजून देत आहेत काय- निलेश सांबरेचार महिने दुर्लक्षआम्ही मुख्याधिकारी नेमण्यासाठी मंत्री सवरा यांच्याकडे पाठपुरावा करीत आहोत़ मात्र त्याकडे दुर्लक्ष केले-रविंद्र खुताडे, नगरध्यक्ष, विक्रमगड