तलवाडा : आधुनिक युगाच्या धापळीच्या काळाच्या सर्वच सणांचे रुप पालटले आहे़ तरी विक्रमगड तालुक्यातील अनेक गावात प्रामुख्याने ग्रामीण भागात मात्र आजही पारंपारिक पध्दतीनेच सन साजरे करण्याची पद्धत आहे. या गावात एक गाव होळीची परंपरा आजही आबाधित ठेवली आहे़ याउलट शहरी भागात गल्ली-गल्लीत प्रत्येक सोसायटी, नगरात छोटया मोठया होळया पेटवुन नंतर धुळवडीचे रंग उधळले जातात़विक्रमगड, जव्हार व मोखाडा या आदिवासी तालुक्यांमध्ये या सणावराची शोभा द्विगुणीत होते ती आदिवासींकडे असलेल्या विविध कला व पारंपारीक नृत्यकलेमुळे. त्यामध्ये तारपा, टपरी नाच, ढोलनाच ही नृत्य साजर करुन सर्व गाव असो वा पाडा असा एकत्र येऊन सामुहिकरित्या होळीचा आनंद लुटला जातो.पहिले तीन दिवस छोटया होळया, चौथ्या दिवशी चोरटी होळी आणि शेवटच्या म्हणजेच ०१ मार्चला पाचव्या दिवशी मोठी होळी असा पाच दिवस होळीचा सण साजरा केला जातो़. या पाच दिवसांत लहान मुले वाजवत असलेल्या डफºयांचा (डफली) आवाज आजही शिमग्याला पारंपारिक ग्वाही देत आहे़ चोरटी होळीसाठी तरुण गावातुनच लाकडे चोरुन आणतात़ अशी मौज असते.पोस्त मागण्याची परंपरातालुक्यातील मोठी बाजारपेठ म्हणजे विक्रमगड शहर. तसे गावागावात आठवडाबाजार भरतात परंतु सणाकरीता विक्रमगड शहरातून खरेदी करण्याची परंपरा आहे़ त्यानुसार होळीसाठी सध्यस्थितीत विक्रमगड बाजार फुललेला असून आजु बाजुच्या खेडयावरील आदिवासी लोक बाजाराप्रमाणे चार दिवस गर्दी करीतात. यावेळी पोसत मागण्याकरीता पुरुष महिलेचे कपडे घालून गमती करतात. कुणी तोंडाला, अंगाला रंग लावुन वेगळा पेहराव करुन अगर फुटलेला पÞत्राचा डबा वाजवत, मुखवटा लावुन घराघरातुन दुकानदारांकडुन पोसत (पैसे) मागतात.भेंडी अन् बांबुच्या फांदीला मानहोळीच्या दिवशी भेंडीचे झाड (फांदी) अगर बांबुच्या फांदया होळी माता म्हणून पुजा केली जाते. पुजेला तांदळाच्या नागलीच्या व कुरडई च्या पापडया, पुरणपोळी तसेच घरी बनवलेल्या वस्तुंचे नैवैद्य दाखविले जाते़ बांबु किंवा भेंडींच्या फांदीला टोकाला खेडयावर अगर रितीप्रमाणे जिवंत कोंबडीचे पिल्लु बांधले जाते. ही प्रथा आजही आबाधीत आहे. ़त्याचप्रमाणे नव विवाहीत जोडपी आपल्या पत्नीला खांदयावर घेवुन होळी मातेला प्रदक्षिणा घालण्याची प्रथा असून ती आजही मोठ्या हौसेमौजेने पार पाडली जाते़
विक्रमगडमध्ये एक गाव, एक होळीची परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 1:21 AM