शहरं
Join us  
Trending Stories
1
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
2
विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!
3
अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 
4
सोने लक्ष्मीपूजनापूर्वीच प्रथमच गेले ८० हजारांवर; चांदीनेही खाल्ला भाव
5
"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल
6
इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण
7
स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक
8
पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 
9
दोन ठिकाणांवरील भारत, चीन सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण
10
भाजप बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला 
11
विराटला लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या इंग्लिश खेळाडूची RCB मध्ये एन्ट्री; चाहत्यांनी घेतली फिरकी
12
'...तर अजित पवार पुन्हा विचार करतील'; नवाब मलिकांबद्दल शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?
13
Shubman Gill कमी पगारात मोठी जबाबदारी घ्यायला झालाय 'राजी'; जाणून घ्या त्यामागचं कारण
14
'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'सोबत 'क्रिकेटच्या देवा'ची दिवाळी; साराने शेअर केली झलक, Photos
15
"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..."
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
17
“तुमच्याकडे वडील म्हणून पाहतो आणि तुम्ही...”; अजित पवारांच्या आरोपांवर आर आर पाटलांच्या कन्येचं प्रत्युत्तर
18
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!
19
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
20
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!

स्थलांतरित शेतीसाठी गावाकडे

By admin | Published: May 24, 2016 2:48 AM

काही दिवसांवर येवून ठेपलेल्या पावसाळयापूर्वीची शेतींची आणि घरांची कामे करण्यासाठी स्थलांतरीत आदिवासींनी आपल्या घराच्या दिशेने धाव घेतली आहे. कुणी घरांची कौले चाळतांना दिसत

विक्रमगड : काही दिवसांवर येवून ठेपलेल्या पावसाळयापूर्वीची शेतींची आणि घरांची कामे करण्यासाठी स्थलांतरीत आदिवासींनी आपल्या घराच्या दिशेने धाव घेतली आहे. कुणी घरांची कौले चाळतांना दिसत आहेत. कुणी घराच्या छपरांची डागडुजी करीत आहे. तर कुणी शेतात राब-राबणी, बांधबंदिस्ती करतांना दिसत आहे. एकंदरीत सर्वच पावसाळयापूर्वीच्या तयारीला लागलेले दिसत आहेत. चार महिने काम धंद्याकरिता बाहेर गावी गेलेले भूमीपुत्र आपल्या माहेरवाशी गावाला येतांना दिसत आहे. विक्रमगड तालुक्यात जून ते सष्टेंबर असा चार महिने शेतीचा हंगाम असतो. पावसाळयात ज्या काही वस्तू लागतात त्या चार महिने पुरेल अशा खरेदी करुन ठेवल्या जात आहेत. विक्रमगड तालुक्यातल्या आपल्या गावी शेती हंगामाचे चार महिने सोडले तर तसा कोणताही रोजगार नाही त्यामुळे शेती हंगाम संपताच येथील गाव-खेड्यापाडयावरील भूमीपुत्र रोजगारासाठी शहरात स्थलांतरीत होत असतात.आधुनिक व नवीन तंत्रज्ञाचे युग असल्याने शेतीमध्ये नवीन बदल झालेले आहे.आज अनेकजण प्रामुख्याने ट्रॅक्टरच्या सहाय्याने जमिनीची नांगरट करीतांना दिसतो कारण कमी वेळेत जास्त काम होते. परंतु जुन्या लोकांच्या सांगण्यानुसार गावठी बैलांच्या नांगरटीने जमिनीचा कस व्यवस्थीत राहून खोलपर्यत जमीन नांगरली जाते व पिकास ते चांगले असते. ग्रामीण भागात आजही जास्त प्रमाणात बैल नांगरांचा वापर होतो. शेतीसाठी लागणारी अवजारे कोयता,नांगर, यांची दुरुस्ती केली जाते. तर शेतामध्ये पेरण्यासाठी बी-बियाणांची साठवण बाहेर काढली जाते. शेताची बांध-बंदिस्ती केली जाते. आवश्यक त्या सर्व गोष्टी पाऊस पडण्याच्या अगोदरच केल्या जातात. पावसाळयात घर गळू नये याकरिता कौले चाळून घेतलेली जातात. जुनी, फुटकी कौले बदलून त्या जागी नवीन कौले टाकणे यालाच कौले चाळणे असे म्हणतात. घरासमोरील पागोळ््याचे पाणी आत येऊ नयेकरिता छोटीशी पडवी बांधली जाते. पावसाळ््यासाठी घराची डागडुजी करुन घरामध्ये चार महिने पुरेल असे साहित्य साठवून ठेवले जाते.शेती करणे जिकरीचे होत चालेले आहे. निसर्गाचा लहरीपणा, कमी जास्त प्रमाणात पाऊस, मजुरीचे,बी-बियाणांने,खते, शेती अवजारे यांचे भरमसाठ वाढलेले दर व एवढे करुनही पाहीजे तसे उत्पन्न हाती पदरी पडत नसल्याने आर्थिक नुकसान व घेतलेले कर्ज फेडण्याची चिंता या साऱ्यामुळे शेतीकरी मेटाकुटीस आला आहे. परंतु पूर्वापार रितीरीवाजाप्रमाणे, वंशपंरापरागत असलेला व्यवसाय आजही ग्रामीण भागात जोपासाला जात आहे. (वार्ताहर)- नांगराकरिता नवीन बैलजोडी,नवीन विळे,नांगराचे नवीन फाळ,नवीन लाकडी नांगर बनवून घेणे ही कामे करीत असतात. कारण एकदा का पाऊस सुरु झाला की शेतक-यांच्या कुटुंबाला बाजारात जाणे शक्य नसते. - दिवसेंदिवस लोकंसख्या वाढत चालेली असल्याने मोठया कुटुंबात पूर्वीप्रमाणे एकत्र राहाणे दुरापास्त होत चाललेले आहे. आपसात असलेल्या जमीनीची वाटणी करुन विभक्त कुटुंब पध्दतीने राहण्यामुळे वडिलो पार्जीत जमिनीचे छोटे छोटे तुकडे होत आहेत. त्यामुळे शेती अधीकच आतबट्टयाची ठरते आहे.