नालासोपारा : वसई तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून चेनचोरांचा सुळसुळाट झाला असून मोटार सायकलवर आलेले चोरटे लाखो रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने खेचून पळून जात आहेत. या चेनचोरांवर अंकुश लावण्यात पोलीस अपयशी ठरले असून या गुन्ह्यांची उकल करून आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
नालासोपारा आणि विरार या दोन्ही पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोन्याचे गळ्यातील दागिने खेचून नेल्याचे तीन गुन्हे दाखल केले आहेत. नालासोपारा पश्चिमेकडील लक्ष्मीबेन छेडानगर येथील चंद्रेश सोपारा शॉपिंग सेंटर येथे राहणाऱ्या संगीता वसंत बागवे (४५) व संजना आंगवेकर, सविता घाडगे आणि प्रणाली तेली या मैत्रिणी पाटणकर पार्कयेथे राहणाºया प्राजक्ता चव्हाण यांच्याकडे हळदीकुंकूच्या कार्यक्र माला गेल्या होत्या. रात्री साडेअकराच्या दरम्यान त्या घरी पायी परतत असताना सेंट फ्रान्सिस शाळेजवळील रस्त्यावर भरधाव वेगातील काळ्या रंगाच्या मोटार सायकलवरून आलेल्या चोरट्याने संगीता यांच्या गळ्यावर फटका मारून २ लाख १० हजारांचे ७ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि ४५ हजारांचे दीड तोळे वजनाचे दुसरे मंगळसूत्र असे एकूण २ लाख ५५ हजारांचे दागिने खेचून नेले आहे.दुसºया घटनेत पश्चिमेकडील नारायण शाळेसमोरील वास्तू रेसिडन्सीमध्ये राहणाºया कांचन मेलवीन डिमेलो (४०) या शुक्रवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कामावर जाण्यासाठी निघाल्या. त्या स्टेशनकडे येत असताना भरधाव वेगात मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांपैकी एकाने कांचन यांच्या गळ्यातील ४५ हजारांचे दीड तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून पळून गेले आहे.मॉर्निंग वॉकवरून परतताना खेचले मंगळसूत्रतिसºया घटनेत विरार पश्चिमेकडील विराट नगरमधील समीर सहयोग बिल्डिंगच्या सदनिका नंबर १४ मध्ये राहणाºया अक्षया अवधूत नेमळेकर (५५) या शुक्रवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉक करून घरी परतत असताना इमारतीसमोरच भरधाव वेगात मोटार सायकलवरून आलेल्या चोरट्याने अक्षया यांच्या गळ्यातील ३२ हजारांची एक तोळे वजनाची सोन्याची चेन खेचून नेली आहे. विरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.