विरार : विरार पश्चिम येथे राहणाऱ्या सदस्यांना मार्च पासून वीज बिले दुप्पट तिप्पट वाढून येत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. सप्टेंबरपर्यंत नवीन मीटर बसवण्यात येतील असे आश्वासन वितरण विभागाकडून देण्यात आले होते, पण अद्यापही त्याचे काम पूर्ण न झाल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.मार्चपासून वाढून येणाºया वीज बिलाचा नागरिकांना त्रास होत आहे. ही बिले कमी करवून घेण्याकरिता त्यांना वितरण विभागात चकरा माराव्या लागत आहेत. दर महिन्याला नागरिकांना हे कष्ट घ्यावे लागत असून, विरार पश्चिम या परिसरात जुलै महिन्यात पावसाच्या अतिवृष्टीमुळे पाणी भरल्यामुळे विजेच्या मीटरमध्ये बिघाड झाले होते. मार्चपासून विजेचे बिल वाढवून येत असल्यामुळे मीटर जुने झाले आहेत ते बदलायला हवे असे वितरण विभागाकडून नागरिकांना सांगण्यात आले. जुलैनंतर पाणी भरल्यामुळे मीटर खराब झाले आहे व ते बदलायला हवे अशी कारणे महावितरण विभागाकडून देऊन विषय टाळण्यात येत आहे. सप्टेंबरात मीटर बदलण्याचे आश्वासन देण्यात आले होते व त्यानंतर वीज बिलात वाढ होणार नाही अशी खात्री देखील महावितरणच्या अधिकाºयांनी दिली होती. पण आता दोन महिने झाले तरीही चाणक्य चौकातील रहिवाशांना दुप्पट तिप्पट वीज बिल येत आहे. शनिवारी बिल भरायला गेलेल्या नागरिकांनी वीज विभागाविरु द्ध तक्र ार केली व परत जर बिल वाढवून आले तर आम्ही मोर्चा काढू असा इशारा नागरिकांनी दिला आहे.अनेकदा तक्रार करून देखील गेल्या ९ महिन्यांपासून दुप्पट तिप्पट बिल येत असल्याने नागरिक हैराण आहेत. महावितरणमध्ये चकरा मारून नागरिकांचे हाल पाहायला अधिकाºयांना काही मज्जा वाटते का? असा सवाल संतप्त नागरिकांतून होत आहे. नागरिकांच्या सेवेसाठी बसलेले अधिकारी त्यांच्या त्रासाचे कारण बनत आहेत. मीटर खराब असेल तर ते लवकरात लवकर दुरुस्त करण्याचे काम महावितरणचे आहे, पण, त्यात देखील टाळाटाळ होत असल्यामुळे आता मोर्चा काढण्याशिवाय पर्याय नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे.महावितरण विभागातील अधिकारी कारंजेकर यांचे असे म्हणणे आहे की ‘मीटर बसवण्याचे काम लगेच पूर्ण होत नाही आज चार मिटर बसवले तर उद्या चार बसतात. त्यामुळे त्या प्रक्रियेला वेळ लागतो आहे. ज्याकाही तक्रारी आहेत त्याची नोंद आम्ही घेत आहोत त्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी देखील आम्ही घेऊ. परंतु त्यावर विश्वास ठेवण्यास आता ग्राहक तयार नाहीत. कारण त्यांचा यापूर्वीचा अशा अश्वासनांचा अनुभव धड नाही.महावितरण अधिकाºयांची दादागिरी आम्ही आता चालू देणार नाही, क्रित्येक महिने आमची लूट होत आहे. तर ते दुरु स्त करण्याचे काम आमचे कि त्यांचे? असा देखील प्रश्न नागरिकांनी अधिकाºयांना केला आहे. प्रत्येक वेळी अधिकाºयांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव का करून द्यावी लागते? त्यांनी काम सोडावं. असे पाटील यांनी सांगितले. तर या सर्वात आता महापालिकेने लक्ष घालावे अशी विनंती केली गेली आहे.
नादुरुस्त वीज मीटरमुळे विरारला बिले वाढली, सोसायट्या हैराण, सामान्य नागरिक त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 2:47 AM