- ऑनलाइन लोकमत
वसई, दि. 30 - बोगस कागदपत्रे तयार करून १६ इमारती बांधून फसवणूक केल्याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा १६ बिल्डरांविरोधात फसवणूक आणि एमआरटीपी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विरार पूर्वेकडील मनवेलपाडा येथे १६ बेकायदा इमारती बांधण्यात आल्या आहेत. या इमारती बांधताना बोगस कागदपत्रे बनवल्याच्या तक्रारा वसई विरार पालिकेकडे आल्या होत्या. पालिकेने याची शहानिशा केल्यानंतर विरार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
सहाय्यक आयुक्त्त प्रेमसिग जाधव यांनी फिर्याद दिल्यानंतर दयानंद पाटील, सचिन राऊत, अजय मधुकर पाटील, उमेश चिकणे, अरुणा दीपक राऊत, राजेश सदानंद वत्सा, कौस्तुभ भालचंद्र म्हात्रे, रुपेश विठ्ठल नाईबागकर, मनमोहन सिंग, हर्षद भरत पाटील, वसंत रघुनाथ राऊत, सुनीत पांडुरंग पाटील, रोशन नरेंद्र चोरघे, इंद्रजित अनंत चौधरी, निखिल प्रमोद वैद्य, किशोर नामदेव पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.