शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
3
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
4
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
5
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
6
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
7
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
8
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
9
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
10
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
11
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
12
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
13
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
14
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
15
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
17
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
18
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
19
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
20
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video

असुविधांचे माहेरघर बनले विरार स्टेशन

By admin | Published: January 23, 2016 11:29 PM

पश्चिम रेल्वेवरील गर्दीमध्ये चौथ्या क्रमांकावर विरार रेल्वे स्टेशन आहे. विरार रेल्वे स्टेशनमधून दररोज किमान दोन लाखाच्या आसपास प्रवाशी ये-जा करतात. तर विरार येथून रेल्वे दरदिवशी

वसई : पश्चिम रेल्वेवरील गर्दीमध्ये चौथ्या क्रमांकावर विरार रेल्वे स्टेशन आहे. विरार रेल्वे स्टेशनमधून दररोज किमान दोन लाखाच्या आसपास प्रवाशी ये-जा करतात. तर विरार येथून रेल्वे दरदिवशी अठरा लाखाच्या आसपास महसुल मिळतो. प्राथमिक सुविधांपासून दूर असलेल्या विरार स्टेशन परिसरात प्रवाशांना आजही रेल्वे रुळ ओलांडून ये-जा करावी लागत असल्याने गेल्यावर्षभरात ७४ जणांचा जीवगेला असून ५२ जण गंभीर जखमी झाले आहेत. डहाणू लोकल सुुरु होण्यापूर्वी विरार रेल्वे स्टेशन पश्चिम रेल्वेचे शेवटचे उपनगरीय स्टेशन होते. त्याचबरोबर येथून डहाणूला नियमित शटल सेवा आहे. तसेच लांबपल्लयांच्या अनेक गाड्याही विरारला थांबतात. मात्र प्रवाशांना कोणत्याच सुविधा उपलब्ध नाहीत. विरार स्टेशनमध्ये एकूण सात फलाट आहे. त्यातील फलाट क्रमांक एक स्टेशनपासून दूर आहे. या फलाटावर पुरेसे पंखे, बसण्यासाठी बाके नाहीत. वीजेची सोय अपुरी असल्याने रात्री बऱ्यापैकी अंधार असतो. महिलांसाठी असुरक्षित असलेल्या फलाटावर प्रवाशांचा विरोध असतानाही रात्री उशिरा लोकल येतात. त्यामुळे अंधारात पायपीट करीत स्टेशनकडे ये-जा करावी लागते. या फलाटावरून नियमित लोकल सुटत असली तरी प्रवाशांसाठी ना स्वच्छतागृह आहे ना पाणपोई.फलाट क्रमांक दोनचीही तिच स्थिती आहे. याठिकाणी संपूर्ण फलाटावर छप्पर नाही. फलाटावर असलेले एकमेव स्वच्छतागृह पादचारी पुलासाठी तोडून टाकण्यात आले आहे. तर माजी नगरसेवक विलास चोरघे यांनी स्वत: खर्चून बांधलेले आणि प्रवाशांच्या पसंतीला उतरलेले गार्डन रेल्वेने पादचारी पुलासाठी तोडून टाकले. फलाट क्रमांक दोन-तीनची अवस्थाही बिकट आहे. याठिकाणी असलेली एकमेव पाणपोई पादचारी पुलासाठी तोडण्यात आली. पण, पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. या दोन फलाटांवरून लोकल आणि लांबपल्ल्यांच्या गाड्या सुटतात. त्यासाठी शेकडो प्रवाशी फलाटावर असतात. पण त्यांना बसायला पुरेसे बाकडे पंखे नाहीत. फलाटावर पूर्ण छप्पर नाही. येथुन रात्री आणि पहाटे गुजरातकडे शटल सुटते. त्यासाठी बरेचसे प्रवाशी फलाटांवरच झोपत असतात. पण, विरार स्टेशनात दोन-तीन फलाटावर एकमेव स्वच्छतागृह तेही छोटेंसे आणि अतिशय घाणेरडे आहे. याठिकाणी नैसर्गिक विधीसाठी प्रवाशी अक्षरश: रांगा लावून उभे असलेले दिसतात. (प्रतिनिधी)विरार रेल्वे स्टेशनवर एक सबवे आहे. तोही घाण आणि उग्र वास प्रवाशांना त्रस्त करीत असतो. काही अपवाद वगळता सबवे फेरीवाल्यांच्या बाजाराने भरलेला असतो. त्यानंतर एक जुना पादचारी पूल आहे. तर पुढे नवा पादचारी पूल बांधण्यात आला आहे. दुसरी कोणतीच सुविधा नसल्याने शेकडो प्रवाशी रुळ ओलांडून ये-जा करताना दिसतात. त्यामुळे विरार रेल्वे परिसरात रेल्वे अपघातात ठार आणि गंभीर होण्याची संख्या सर्वाधिक आहे. गर्दी पाहता याठिकाणी तिकीट खिडक्यांची संख्या अपुरी आहे. एटीव्हीएम मशीन आहेत पण त्याही पुरेशा नसल्याने तिकीटांसाठी नेहमी मोठ्या रांगा लागलेल्या दिसतात.फलाट क्रमांक चार-पाच अतिशय घाणेरडे आणि उग्र वास असलेले ठिकाण. तरीही लोकल आणि शटल प्रवाशी ताटकळत उभे राहतात. पाच क्रमांकाच्या फलाटावर रात्री एक शटल उभी असते. या फलाटावर वीजेचे दिवे कमी असल्याने रात्री अंधार असतो. फलाट क्रमांक चार-पाच विरार परिसरातील बेघर, भिकारी, गर्दुल्ले यांचे हक्काचे निवासस्थान बनले आहे. हीच माणसे रात्रभर शटलमध्ये बसून नैसर्गिक विधी करीत असतात. त्यामुळे त्याठिकाणी प्रचंड घाण आणि डोके दुखवणारा उग्र वास असतो. या फलाटावर ना बाके आहेत ना पुरेसे पंखे, त्यात उग्र वासाने उठणारे डोके याही स्थितीत प्रवाशी संयम न सोडता गाडीची वाट पहात उभे असतात.