शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

वाघोबा धबधब्यावर पर्यटकांना सक्त मनाई

By admin | Published: August 08, 2016 1:59 AM

पालघर मनोर रस्त्यावरील वाघोबा घाटा जवळील धबधब्या वरील मोठमोठे दगड आणि दरड कोसळण्याच्या मार्गावर असल्याने वनविभाग आणि पोलिसांनी पर्यटकांना धबधब्यावर यायला

पालघर : पालघर मनोर रस्त्यावरील वाघोबा घाटा जवळील धबधब्या वरील मोठमोठे दगड आणि दरड कोसळण्याच्या मार्गावर असल्याने वनविभाग आणि पोलिसांनी पर्यटकांना धबधब्यावर यायला बंदी घातली आहे.तर बाजूच्याच रस्त्याच्या कडेजवळील डोंगरावरही १५ ते २० टनाची महाकाय शिळा आणि दरड ही धोकादायक अवस्थेत अडकलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून येत असल्याने जिल्हाधिकाऱ्याने त्याबाबतही गांभीर्यपूर्वक उपाययोजना आखण्याच्या सूचना वनविभागाला दिले आहेत.मागील ७ दिवसांपासून पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले असून निसर्गाने धारण केलेल्या रौद्रावताराने जिल्ह्यात आता पर्यंत २२ बळी घेतले आहेत. मागील २० जून पासून जवळपास नियमितपणे कोसळणाऱ्या पावसाने सर्वांचा जीव नकोसा करून टाकला आहे. सावित्रीच्या घटनेनंतर तर पावसाने सर्वांच्या मनात दहशत माजवून ठेवली आहे.आपापल्या घरातून नोकरी, व्यवसाय, शिक्षण ई.साठी बाहेर पडणारा माणूस घरात संध्याकाळी सुखरूप येईलच याची शाश्वती राहिली नसल्याने अनेक कुटुंबीय काळजीत जगत आहेत.पालघर जिल्ह्यात आता पर्यंत विक्रमी पावसाची नोंद झाली असून अनेक नदी, नाले, धबधबे, ओसंडून वहात आहेत. पालघर मनोर रस्त्यावरील वाघोबा घाटातील धबधबा हा पालघर आणि परिसरातील पर्यटकांचा आवडीचे ठिकाण बनला असल्याने शनिवार,रविवार आणि अन्य सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. परंतु सतत कोसळणाऱ्या तुफानी पावसामुळे या धबधब्याच्या दोन्ही बाजूचे दगड आणि दरडी कोसळल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही गंभीर बाब आणून दिल्या नंतर वन विभागासह पालघर पोलिसांनी या ठिकाणी आपली गस्त वाढविली असून पर्यटकांना येण्यास बंदी घातली आहे. या संदर्भात पालघर चे वनसंरक्षक कुप्ते यांच्याशी संपर्क साधला असता वनकर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता धोकादायक परिस्थिती वाटत नाही, तरीही त्या ठिकाणी गस्त ठेवली आहे, असे सांगितले. (प्रतिनिधी)