पारोळ : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजपा चे उमेदवार राजेंद्र गावीत यांच्या नालासोपारा येथील प्रचार सभेत राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी २९ गावांचा वसईतील मोठा प्रश्न हाताळून या शहरामध्ये एक पक्ष शिटी वाजवत अनाधिकृत बांधकामे करतो तर दुसरा भगवा खांद्यावर घेऊन खंडणी गोळा करतो अशा अनेक मुद्यावर वसईतील सत्ताधारी व विरोधकांवर जोरदार टीका केल्याने ज्या हेतूने ही सभा लावली तो यशस्वी झाल्याने भाजपा कार्यकत्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी नालासोपाऱ्यात जी जाहीर सभा घेतली त्यानंतर वसई तालुकात भाजपा ला चांगले बळ मिळाले. सभेच्या आधीविरोधी पक्ष, सत्ताधारी पक्ष आणि सगळे कार्यकर्ते आणि नागरिक यांच्यात मुख्यमंत्री वसई तील सत्ताधारी व विरोधात काही बोलणार का? याकडे लक्ष लागले होते. या भागातील सताधारी यांच्या विरोधात बोलताना, इलाखा तो कुत्ते-बिल्लीओंका होता है। हम तो जंगलके शेर है, शेर कही भी जा सकता है, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी त्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांना खिशात ठेवण्याची भाषा करणाºयांना उत्तर देताना मुख्यमंत्री खिशात येतील असा खिशाच नाही. मुख्यमंत्र्यांना तुम्ही मनात कैद करू शकता, खिशात नाही. असा समाचार घेतला.कार्यकर्त्यांना होती भीतीकाही दिवसांपूर्वी वसईत राज ठाकरेंनी देखील या सत्ताधारी व विरोधक यांच्याविरुद्ध एकही शब्द न बोलता मनसैनिकांचा भ्रमनिरास केला होता, त्याच पध्दतीने मुख्यमंत्री हे देखील विरोधात काही बोलले नाही तर, अशी भीती भाजपच्या कार्यकर्त्यांना होती.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर मतदार खूश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 2:45 AM