विक्रमगड - तालुक्यातील सुकसाळे, जांभा, वेहेलपाडा, मोहबु या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका रविवारी होत असून या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी एकुण ९ जागांसाठी २० उमेदवार रिंगणात आहेत. २७ ग्रामपंचायाती पैकी ६ ग्रामपंचायतीमध्ये अर्ज प्राप्त न झाल्याने व १७ ग्रामपंचायती बिनविरोधत झाल्या होत्या. गेल्या महिनाभरापासुन धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा शुक्रवारी थंडावल्या होत्या. तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी २३ जुन रोजी मतदान होणार आहे़ यासाठी सरकारी यंत्रणा सज्ज झाली आहे़ विक्रमगड तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या पाच मतदार केद्रावर रविवारी सकाळी ७़ ३० ते सायंकाळी ५़ ३० या वेळेत निवडणुक होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. निवडणुक शांततेत पार पाडाव्यात यासाठी पाचही मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्या आहेत. या निवडणूकीचे निकाल २४ जुन रोजी पंचाय समिती कार्यालय विक्रमगड येथे उपलब्ध होणार असून विक्रमगड तालुक्यातील २७ पैकी ०४ ग्रामपंचायतीची मतमोतणी २३ जुन रोजी पंचायत समिती कार्यालय विक्रमगड येथे होणार आहे़ त्या अनुशंगाने तेथे कडक पोलिस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी तहसीदार कार्यालयाकडून व पोलिस कर्मचारी, अधिकारी व राखीव दजाच्या तुकडया मिळून ४४ कर्मचारी नेमण्यात आले आहेत़. त्यामध्ये मतदान केंद्राध्यक्ष-५, मतदान अधिकारी एक-५, मतदान अधिकारी दोन-५, मतदान अधिकारी तीन-५, शिपाई-५, पोलिस कर्मचारी-५, राखीव टीम एक कर्मचारी-५, निवडणुक निर्णय अधिकारी -०३, झोनल अधिकारी-४, लिपीक-२ असे कर्मचारी यंत्रणा सज्ज झाली आहे़ गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला या ग्रामपंचायत निवणुकीचा प्रचार शुक्रवारी थांबला असून उमेदवार रविवारी होणाºया निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. विक्रमगड तालुक्यातील ४ ग्रामपंचायतीच्या ५ वार्ड ९ जागांसाठी निवडणूक होत आहे़ आज मतदाराचे भवितव्य मतपेटीत बंद होऊन निकालाची प्रतिक्षा करावी लागणार आहे़ स्थानिक स्वराज्यस्थेमध्ये ग्रामीण भागाच्या विकासासाठी ग्रामपंचायतींना महत्व प्राप्त झालेले आहे़ गेल्या काही वर्र्षांमध्ये तालुक्याच्या ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्यसंस्थेच्या माध्यमातुन झालेल्या विकासकामांमुळे चेहरा-मोहरा बदलत चालला आहे. झालेल्या विकासकामांमुळे व होणाºया विकासकामांमुळे अनेक गावांची खेडयांची वाटचाल ही शहरीकरणाच्या दिशेने होत आहे़ ग्रापंचायतींनी आपला विकास आपल्या हाती ही संकल्पना राबविल्याने हे शक्य होतआहे़
चार ग्रामपंचायतींसाठी आज मतदान, नऊ जागांसाठी २० उमेदवार रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 12:57 AM