वाडा:पालघरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांना मोर्चा दरम्यान श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याच्या घटनेचे पडसाद जिल्हाभर उमटले असून बुधवारी वाडा पंचायत समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करुन या घटनेचा निषेध केला. सोमवारी (दि, २४) श्रमजीवी संघटनेने डोहाळ जेवण आंदोलन जिल्हा परिषद पालघर येथे करण्यात आले. या आंदोलना दरम्यान पूरक पोषण आहारातून बनवलेले लाडू जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांना देण्यात आले. हे पदार्थ बेचव असल्याचे मान्य करुन वरिष्ठ पातळीवर अभिप्राय कळवला आहे. असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले मात्र कार्यकत्यानी मागण्यांबाबत लेखी आश्वासनाची मागणी करुन त्यांना काही तास घेराव घातला. निधी चौधरी यांनी कार्यालयाबाहेर जाण्याचा प्रयत्न केला असता कार्यकर्त्यांनी त्यांना रोखले. या घटनेचा निषेध म्हणून आज वाडा पंचायत समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामबंद आंदोलन केले. या बाबतचे निवेदन वाडा तहसीलदारांना देण्यात आले.
वाडा पं.स. कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
By admin | Published: April 26, 2017 11:34 PM