हुसेन मेमनजव्हार : गुजरात व दादरा नगर हवेली केंद्रशासित प्रदेशांच्या सीमालगत असणारी तालुक्यातील गावे आजही अनेक सुविधांपासून वंचित आहेत. त्यांना मूलभूत सुविधांसाठी आजही झगडावे लागत आहे. यामध्ये रुईघर, बोपदरी, दाभेरी, पाचबुड, सागपाणा, सरोळीपाडा, रिठीपाडा यांचा समावेश आहे. त्यांना आजही रस्ते, आरोग्य, शिक्षण, पाणी, वीज, अशा मूलभूत सुविधा मिळालेल्याच नाहीत.यापैकी सरोळीपाडा, रिठीपाडा, पाचबुड या पाड्यांत विद्युत कनेक्शन पोहचले नाही. विशेष म्हणजे येथील विद्युतजोडणीला शासनाकडून मंजुरी मिळून पाच वर्ष झाली आहेत.मात्र अजूनही ही जोडणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे येथील आदिवासींना आजही अंधारात जीवन जगावे लागत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना रॉकेलचा दिवा वापरुन अभ्यास करावा लागतो आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे तीनतेरा वाजले आहेत.सागपणा, रिठीपाडा, पाचबुड, या पाड्यांतील नागरिकाच्या नशिबी फेब्रुवारी महिन्यापासून पाणीटंचाई पूजलेली आहे. दरवर्षी येथील आदिवासींना उन्हाळ््यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहेत.ही गावे जव्हार तालुक्यापासून ४५ कि.मी. अंतरावर आहेत. येथील सीमेलगत आदिवासींना आजही आरोग्याच्या सुविधेसाठी दादरा नगर हवेली किंवा गुजरातचा आसरा घ्यावा लागत आहे.आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात व येथील गाव-पाड्यातील आदिवासींचा विकास व्हावा म्हणून शासनाकडून दरवर्षी करोडो रुपयांचा निधी खर्च होतो. परंतु, त्यांचे दैन्य काही संपत नाही. त्यामुळे तो जातो तरी कुठे असा प्रश्न जनतेला पडतो.>सगळ््याच बाबत आहे नन्नाचा पाढाया भागातील नागरिकांना शासनाकडून सुविधा मिळत नसल्याने, या भागात कुपोषणाचे प्रमाण अधिक आहे. रोजगार नसल्याने त्यासाठी होणाºया स्थलांतरणाचे प्रमाण खूप मोठे आहे. त्यामुळे नव्या पिढीच्या शिक्षणावर त्याचा विपरीत परिणाम होतो. रोहोयोची कामे वेळेवर सुरु होत नाहीत. मजुरी वेळवर मिळत नाही त्यामुळे ही योजना असून नसल्यासारखीच ठरली आहे.
जव्हार तालुक्यातील गावे विकासाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 3:01 AM