नालासोपारा - वसई तालुक्यातील खोचिवडे येथील अमली पदार्थाचे सेवन करणाºया मुलाने आत्महत्या केल्याने नायगाव, खोचिवडे व उमेळा येथील ग्रामस्थांनी एकत्र येत रविवारी नशेडींना यथेच्छ चोप दिला. रविवारी सर्वांनी बैठक घेऊन या विरोधात मिशन उभी करण्यात आली. खोचिवडे परिसरात व्यसनाधिनता तुलनेने जास्त असल्याने तेथे तपासणी करण्यात आली व नशा करताना जे जे दिसले त्यांची धुलाई करण्यात आली. या बाबत वसई गाव पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले आहे.खोचिवडे येथे राहणारा उदित पाठक हा तरूण अमली पदार्थ सेवनाच्या आहारी गेला होता. त्याला या अमली पदार्थाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी कुटुंबियांनी त्याला शिरसाड येथील व्यसनमुक्ती केंद्रात ठेवले होते. मात्र, तेथे त्याने नैराश्यात येऊन गळफास घेतला. या घटनेने व्यथीत झालेले ग्रामस्थ एकत्र येऊन या पूढे कुणीही व्यसनी होणार नाही यासाठी त्यांनी मुठी आवळल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तिन्ही गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन एक सभा घेतली व या अमली पदार्थ पुरवणाºयांवर कायदेशीर कारवाई करायची असा निर्णय घेतला.ड्रग्ज माफियांवर वचक बसावा म्हणून ग्रामस्थांकडून यापुढेही असे आंदोलन सुरू ठेवण्यात येणार असल्याचे ग्रामस्थ हेमंत मसणेकर यांनी सांगितले. नायगांव पश्चिम परिसरात अमली पदार्थ विक्र ी करणाºयांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. या व्यसनाच्या आहारी गेले आहेत, त्यांच्या घरी जाऊन ग्रामस्थांनी प्रबोधन केले.या मोहिमेत नायगाव कोळीवाड्या नजिकच्या अमोलनगर, विजयपार्क, डायस परेरा नगर, मरियम नगरच्या रहिवाशांनीही भाग घेतला होता. यावेळी पोलिसांना निवेदन देण्यात आले.पुरवठादारांना वाळीत टाकाखोचिवडे येथील या अमली पदार्थाचा पुरवठा करत असल्याचे कळताच ग्रामस्थ त्यांच्या घरी धडकले आणि त्यांनाही समज दिली, पण ते कुटुंबीय ग्रामस्थांचे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याने अमली पदार्थ घेणारे व देणारे यांना व त्यांच्या कुटूंबीयांचा वाळीत टाकावे, अशी सूचनाही काही ग्रामस्थांनी यावेळी केली.या कुटूंबीयांच्या विरोधात वसई पोलिसात या अगोदरही तक्र ारी करण्यात आल्या असताना कारवाई होत नसल्याचा आरोप होत आहे. यावेळी परिसरात शोध घेतला असता काही तरूण नशा करताना आढळून आले होते. त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. भावी पिढी या व्यसनाच्या आहारी जाऊ नये, यासाठी गावकºयांनी पावले उचलली आहेत.नायगाव स्टेशन परिसरात खुलेआम अमली पदार्थ विक्र ी : नायगांव स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात चरस, गांजा आणि अफूसारख्या अमली पदार्थाचे अड्डे आहेत. या मादक पदार्थांची विक्री करण्यासाठी ड्रग्ज माफीयांनी तरूण महाविद्यालयीन तरूणांना हेरायला सुरूवात केली आहे. सुरूवातीला ते या तरूणांना अल्पदरात चरस,गांजा,अफू व हेरोईन उपलब्ध करून देत असतात. मात्र, एकदा चटक लागल्यावर हि तरूण मुले अमली पदार्थ सेवनाच्या आहारी जातात. विशेष म्हणजे हे माफिया या अमली पदार्थाचे सेवन कसे करायचे याचे धडे ही देत असतात. एकदा का हे तरूण अमली पदार्थाच्या आहारी गेले की, चरस, गांजा हवा असेल तर तुमच्या मित्रांनाही घेऊन या अशी अट घालतात.पोलीस दलाकडून अमली पदार्थ विक्री करणाºयांविरोधात कारवाई सुरुच असते. शुक्रवारीच तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये संतोष भूवन येथून सव्वा किलो गांजा पकडला होता. शाळा महाविद्यालयांबाहेर पोलीस गुप्तपणे लक्ष ठेऊन आहेत. मात्र, या नागरिकांनीही सतर्कता दाखविणे गरजेचे आहे.- विजयकांत सागर, अप्पर पोलीस अधिक्षक, वसई
नशेडींची गावकऱ्यांकडून धुलाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2018 2:36 AM