नालासोपारा : नालासोपारा पश्चिमेकडील छेडा नगर परिसरात बुधवारी दुपारपर्यंत गुडघ्यापर्यंत पावसाचे पाणी साचलेले असून महानगरपालिकेचा कोणताही अधिकारी अथवा स्थानिक नगरसेवक फिरकला देखील नाही. यामुळे स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.या पावसाच्या पाण्यामुळे २५ ते ३० इमारतीमधील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गटाराचे काळे पाणी आणि चिखलामुळे दुर्गंधी पसरली असून रस्त्यावर सर्वत्र कचराही अस्ताव्यस्त पडलेला आहे. काही इमारतीमध्ये ३ ते ४ फूट पाणी आहे तर तळमजल्यावर राहणा-या नागरिकांच्या घरात बुधवारी सकाळपर्यंत पावसाचे पाणी होते. तळमजल्यावरील रहिवासी आपल्या बिºहाडासह इमारतीमधील टेरेसवर राहत आहेत. दोन दिवसांपासून या परिसरात कचरा उचलण्यासाठी मनपाचे आरोग्य कर्मचारी आलेले नसून कचरा डब्यात कचरा तसाच आहे. या पाण्याबाबत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कळवूनही लक्ष घातलेले नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत लोकांच्या नाराजीचा फटका बविआला बसण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.नालासोपारा पूर्वेकडील परिसरात दर पावसाळ्यात पाणी साचायचे. पण गेल्या दोन पावसाळ्यात येथे पाणी साचले नाही. उलट पश्चिमेकडे मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचते आहे. पूर्वेकडील रहिवाशांना खूश करण्यासाठी महानगरपालिका आणि नगरसेवक तत्परतेने पावसाचे पाणी साचणार नाही याकडे लक्ष देत आहेत. मग पश्चिमेकडील परिसरात का लक्ष देत नाही असा सवाल नागरिकांनी केला आहे.एरवी निवडणुका आल्या की नगरसेवक मते मागण्यासाठी रहिवाशांना विनवणी केली जाते मते मागणारे नगरसेवक पावसाचे पाणी साचल्यावर कुठे गायब झाले असा तिखट सवालही स्थानिक रहिवाशांनी केला आहे.
सोपाऱ्यातील ३० सोसायट्यांत पाणी; महानगरपालिका कधी जागी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 11:42 PM