शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

पाणी ओसरले पण नुकसान मोठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 2:49 AM

वसई तालुक्यात सतत तीन दिवस पडणाऱ्या पावसामुळे महानगरपालिकेच्या सफाई कामगारांच्या गाड्याही अनेक ठिकाणी पोहचणे अशक्य बनले आहे.

विरार : वसई तालुक्यात सतत तीन दिवस पडणाऱ्या पावसामुळे महानगरपालिकेच्या सफाई कामगारांच्या गाड्याही अनेक ठिकाणी पोहचणे अशक्य बनले आहे. त्यामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी कचºयाचे ठिग वाढले आहेत. पाण्यासोबत लोकांच्या घरात, सोसायटीत कचरा गेल्याने घाणीच्या समस्येला नागरीकांना तोंड द्यावे लागत आहे. सतत पडलेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पाणी साचले होते. त्यामुळे रस्त्यावर कचरा साचून राहिल्याने अस्वच्छता व दुर्गंधीचे प्रमाण वाढले आहे.ज्या ठिकाणी पालिकेच्या गाड्या जाणे शक्य आहे. तेथील कचरा पालिकेच्या सफाई कर्मचाºयांनी उचला आहे. मात्र, अनेक ठिकाणी कुजलेला भाजीपाला व अन्य कचरा साचलेल्या पाण्यात कडून राहिल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे साथीचे आजार देखील मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता असल्याने महापालिकेने तातडीने त्यावर उपाय योजना कराव्यात अशी मागणी नागरिकांतून होत आहे.जवळपास ३० लाख लोकसंख्या असल्येल्या शहरात गेल्या ३ दिवसापासून लागातार पाऊस झाल्याने सर्वच यंत्रणांची परीक्षा झाली. दुकानात ग्राहक नसल्याने दुकानदारांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. त्याचसोबत दुकानात पाणी शिरल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. भिजलेले सामान फुकून देण्याची वेळ दुकानदारांवर आली आहे. तसेच अनेक ठिकाणी सोसायटीच्या टाक्यांमध्ये दुषीत पाणी गेल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.वसई तालुक्यात अनेक ठिकाणी जवळपास ३६ तास लाईट नव्हती. त्यामुळे लोकांना अजूनच त्रासाला सामोरी जावे लागले होते.पोलीस आणि पालिका कर्मचाºयांची मोठी कसरतवीज नसल्याने मोबाईल सेवा देखील ठप्प झाल्या होत्या. सर्वत्र पाणी भरल्याने लाईट बंद ठेवली गेली असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. मात्र, अनेक ठिकाणी मीटरमध्ये पाणी गेल्याने पाऊस गेल्यानंतर देखील मीटर खराब झाल्याने लाईट आली नव्हती.महापालिकेच्या कर्मचाºयांनी अगदी २४ तास न झोपता काम केले. त्याचबरोबर पोलीस देखील मुसळधार पावसात २४ तास काम करत होते. अनेक ठिकाणी पावसात बंद पडलेल्या गाड्या हलवण्याचे काम देखील पोलीस करत होते. नागरिकांचे सेवेसाठी त्यांनी मोठी कसरत केली

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnewsबातम्या