शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

विक्रमगड तालुक्यात पाण्याचा खडखडाट जनता त्रस्त; २७ गाव-पाड्यात पाणी टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 11:55 PM

१ गाव १९ पाडयात टॅकर प्रस्तावित: १५ ते २० दिवस पुरेल इतका पाणी साठा

विक्रमगड : तालुक्यातील गाव पाड्यात पाणी टंचाई तीव्र झाली असून मे महिन्याच्या प्रखर उन्हात भीषण पाणी टंचाई ला सामोरे जावे लागते आहे. ग्रामीण भागातील महिलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. मात्र याकडे संबधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत आल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.त्यामुळे ग्रामीण भागातील पाणी प्रश्न ऐरणीवर आला आहे. जर गैरसोयीकडे वेळेच लक्ष केंद्रित न केल्यास तालुक्यातील पाणी प्रश्न जुनच्या पहिल्या आठवड्यात अधिक भीषण होण्याची चिन्हे दिसून येत आहेत प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पाणी टंचाईची तीव्रता वाढली आहे.

तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक गावांना पाणी टंचाईची झळ बसू लागली आहे अनेक कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. तर काही भागात विहिरींना तळ गाठला आहे. विक्रमगड तालुक्यातील लघुसिंचन प्रकल्प खांड तर लघुसिंचन प्रकल्प मोहूँ खुर्द यातील पाणी झपाट्याने आटू लागले असून गेल्या ३० वर्षात पाहिल्यांदा या लघुप्रकल्पातील पाणी इतके कमी झाले असून हे बंधारे आटले आहेत. तसेच तालुक्यातील देहर्जा, पिंजाळ, तांबाडी या प्रमुख तीन नदयाची पात्रे कोरडी ठाक पडली आहेत. तालुक्यात जेमतेम १५ ते २० दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक असून पाऊस लांबला तर गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. तालुक्यात अनेक कूपनलिका दुरुस्त करण्यात प्रशासनाकडून हलगर्जी होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे तर दुसरीकडे विहिरी बांधण्याच्या कामामध्ये आवश्यक ती गती येत नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील अनेक कूपनलिका नादुरु स्त असल्यामुळे त्याचा फायदा नागरिकांना घेता येत नाही.

तालुक्यात फेब्रुवारी-मार्च महिन्यापासून पाणीटंचाईची सुरु वात होते व मे ङ्क्त जूनच्या दरम्यान ती पराकोटीला पोहचते दरवर्षी उद्भवणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाला यश आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाची यामध्ये हलगर्जी होत असल्याचे दिसून येते. तालुक्यातील कवडास (खोरीपाडा) केव- शेलारआली, सासेआली, रावतेपाडा, वसुरी- सहारेपाडा, बास्ते-दिवेपाडा, बास्ते-गावठाण, टेटवाली-काटकरीपाडा,खुडेद-बिरारीपाडा, साखरे- डोंगरिपाडा, आपटी बु. - पर्हाडपाडा, दांडेकरपाडा, सारशी- तांबडमाळ, खडकी-रिंजडपाडा, केव-रावतेपाडा, तरेपाडा, केव-सासेआळी, शेलारआळी, सुकसाळे- सुरु मपाडा, असे एक गाव व १९ पाड्याना टँकरने पाणी पुरवठा करण्याचे प्रस्ताव आहेत. अनेक गाव पाड्यांना पाणीटंचाईचा फटका बसला असून यावर प्रशासनाकडून अजूनही कोणतीही कायम स्वरूपाची उपाय योजना केली गेली नाही. बोअरवेल दुरुस्त करणे नव्या विहिरी बांधणे, त्यासाठी लाभार्थ्यांना योग्यवेळेत निधी उपलब्ध करून देणे अशी कामे होणे गरजेचे आहे. मात्र प्रशासनाकडून दरवर्षी ह्या गावांना पाणीटंचाई झळ पोहचत असतांना व नव्याने भर पडत असातांना गाव-पाड्यासाठी पाणी पुरवठयात हलगर्जी होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे

गंभीर दुष्काळाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष:विक्रमगड तालुक्यात यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे ऑक्टोबर महिन्यात गंभीर दुष्काळात तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. दुष्काळी नागरीकांसाठी उपाययोजनाची अमलबंजावणी सुरु असली ती संथ गतीने सुरु आहे. सध्या तालुक्यात पाणीटंचाईची उग्र रूप धारण केले आहे. कधी नव्हे ते या वर्षी विक्र मगड तालुक्यातील लघुसिंचन प्रकल्प खांड तर लघुसिंचन प्रकल्प मोहूँ खुर्द येथील बंधाºयातील पाणी झपाट्याने आटू लागले आहे.सध्या ज्या गावात-पाड्यात पाणी टंचाई आहे. त्या मागणी व प्रस्ताव मंजुरी नुसार तीन टँकरने टंचाई ग्रस्त गावांना पाणीपुरवठा केला जात आसून अजुन काही गावात टंचाईनुसार टैंकर वाढ करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. जी गावे पाणी टंचाईग्रस्त आहेत अशा गावांना टँकरन जास्तीत जास्त पाणी पुरवठा करण्याची पुरेपूर खबरदारी घेतली जाईल. - मधुकर खुताडे, सभापती, पंचायत समिती विक्रमगड

२७ गाव पाड्यांना टँकरने पाणीपुरवठातालुक्यात पाणी टंचाईणे उग्र स्वरूप धारण केले असतांना प्रशासना कडून २७ गाव-पाड्यांना तीन टैंकरने पाणी पुरवठा सुरु आहे. यामध्ये खुडेद- घोडीचापाडा, कुंडाचापाडा, झापपाडा, महालेपाडा, जाधवपाडा, सुकसाले- नचणपाडा, सुरु मपाडा, कोंडगाव- गावठाण, सवादे- फडवलेपाडा, कोबाडपाडा, कुंज-बटरीपाडा, साखरे-पागीपाडा, दातेपाडा, राऊतपाडा, आंबिवली-ठाकरेपाडा, विजयनगर, जांभे- गांगडपाडा, घाणेघर- फरलेपाडा, काचरपाडा, मेढीपाडा, पाटिलपाडा, टेटवाली- काकडपाडा, केव-नाळशेत-गावठाण, केव-शिळशेत- तरेपाडा/वेडगेपाडा, तलवाडा-शनवारपाडा, दादडे-रोजपाडा, देहर्जे-घाटाळपाडा, पाड्यांना तीन टैंकरने पाणी पुरवठा केला जात असून १७ फेऱ्या केल्या जात आहेत. दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे तर काही पाड्याना दिवसातून दोन वेळा पाणी पुरवठा केला जात आहे

टॅग्स :Waterपाणीwater scarcityपाणी टंचाई