शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

विक्रमगड तालुक्यात पाणीबाणी, टँकरची मागणी वाढली, सध्या एका टँकरद्वारे होतात चार फेऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 12:35 AM

सुमारे १ लाख १४ हजार लोकसंख्या असलेल्या या तालुक्याची पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस उग्र रुप धारण करीत आहे.

विक्रमगड : सुमारे १ लाख १४ हजार लोकसंख्या असलेल्या या तालुक्याची पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस उग्र रुप धारण करीत आहे़. तालुक्यात दरवर्षी ३४ ते ३५ गावपाडयांना पाणीटंचाईची झळ बसत असते़ व टॅकरने पाणीपुरठा करावा लागतो़यंदा पावसाचे प्रमाण कमी राहील्याने फेब्रुवारी पासूनच येथे पाणी टंचाई सुरु झाली आहे, ती आता मे मध्ये पराकोटीला पोहचली आहे. जोपर्यत चांगला पाउस होत नाही तोपर्यत पाणी टंचाईचा सामना करावाच लागणार आहे़ गेल्या दोन वर्षापासून विक्रमगड तालुक्यातही पावसाचे प्रमाण कमी झाले आहे़ त्यामुळे नदी, नाले, विहीरी आटून विविध गाव पाडयांत पाणीटंचाई सुरु झाली आहे़ सध्या शासनाच्या आठवडा अहवालानुसार खुडेद, घोडीचापाडा, कुंडाचापाडा, झापपाडा, कोंडगाव, गावठाण, सवादे, फडवळेपाडा अशा गावपाडयांना १ टँकरने दिवसाला ४ फे-या मारुन पाणी पुरवठा केला जात आहे़तर अनेक गाव पाडयांचे टँकरचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यांत आलेले आहेत़ सध्या पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता तिन ते चार टँकरची आवश्यकता असून तसा प्रस्ताव पाठविण्यांत आलेला आहे़तालुक्यात गावपाडयातील विविध जलस्त्रोत पूर्ण आटले असून सध्या वेहेलपाडा, देहेर्जे, साखरे, खुडेद, घाणेघर, सुकसाळे, टेटवाली, जांभे, केव, तलवाडा, दादडे या महसुली गावांसह काचरपाडा, फरलेपाडा, मेढीचापाडा, पाटीलपाडा, महालेपाडा, सुरुमपाडा, काकडपाडा, गांगडपाडा नाळशेत, शिळशेत-तरेपाडा-वेडगेपाडा, शनवारपाडा, रोजपाडा आदी ठिकाणी लोकांना पाण्यासाठी नदीचा आसरा घ्यावा लागत आहे़. तसेच डोंगरी पाडयावर देखील अशीच परिस्थिती असून गेल्या १० ते २० दिवसांपासून येथील महिलांना पाण्यासाठी रखरखत्या उन्हांत वणवण भटकंती करावी लागते आहे़.विक्रमगड तालुक्यात या भागत तर दरवर्षी पाणी टंचाईची झळ बसत असतांनाही प्रशासन मात्र कोणत्याही प्रकारची हालचल करतांना दिसत नाही़ त्यामुळे येथील महिलांना पाण्यासाठी पहाटे उठून लांबचा पल्ला असो तरीही ही पायपीट करावीच लागते़ यामुळे महिलांना त्रास सहन करावा लागत असल्याची खंत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्याबाबतही वर्षानुवर्षे काहीही कारवाई होत नाही.टंचाई निवारणाबाबत जिल्हा प्रशासन पुरेसे गंभीर नाहीप्रशासनाने जानेवारी महिन्यापासूनच संभाव्य यावर मात करण्याकरीता टंचाई निवारण आराखडा तयार करुन ती निर्माणच होऊ नये यासाठी याकरीता गंभीर पावले उचलावयास हवी जेणे करुन टंचाईग्रस्त भागाचा वाढत जाणार भार कमी होईल़ फेब्रुवारी महिन्यातच आटत चालेल्या विहीरींमध्ये टँकरने पाणी ओतले पाहीजे़ अशी भूमीका अगोदरच पासून ठेवल्यास पाणी टंचाई होणार नाही.

टॅग्स :Waterपाणी