शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

जलयुक्त शिवार मोखाड्यात फेल; झालेला खर्च पाण्यात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 11:01 PM

करोळ ग्रामपंचायतमध्ये करोडोचा खर्च होऊन देखील टँकरच्या पाण्यावर मदार

रविंद्र साळवेमोखाडा : मुख्यमंत्र्यांनी मोठा गाजावाजा करत सन २०१५-१६ मध्ये दुष्काळावर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान योजना सुरू केले. मुख्यमंत्र्यांनी अनेकवेळा प्रसार माध्यमांशी बोलताना ही योजना सफली झाल्याची वारंवार स्तुतीसुमने देखील उधळली आहेत. परंतु या योजनेचा ग्राउंड रिपोर्ट जर बघितला तर ही योजना पूर्णता असफल झाल्याचे चित्र समोर आले आहे.

मोखाडा तालुक्यातील १ हजार ५२६ आदिवासी लोकवस्ती असलेल्या करोळ ग्रामपंचायतीत गेल्या तीन वर्षात १ कोटींपेक्षा अधिक खर्च करून जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून बंधारे तसेच विविध कामे केली आहेत. असे असताना देखील येथील ग्रामस्थांना डोळ्यात तेल घालून टँकरची वाट पहावी लागत असून टँकरच्या पाण्यावर करोळ वासियांची तहान भागविली जात आहे. करोळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत करोळ लगत असलेल्या गावपाड्यात साईच्छा मंडळ मुबई या सेवा भावी एनजीओने पाचरघर येथे पाण्याची व्यवस्था करून दिली आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात पाचघरवासीयांना दिलासा मिळाला असून करोळ वाशीयांची अवस्था मात्र बिकट आहे

या गावात लागत असलेल्या नदीवर एकामागे एक असे मागील दोन वर्षात ११ बंधारे बांधले आहेत. परंतु एकाही बंधाऱ्यात थेंबरही पाणी नसून कोरडेठाक पडले आहेत. पाऊस असेपर्यत या बंधाºयात पाणी असते पाऊस गेल्यानंतर या बंधाऱ्यांमध्ये पाण्याचा थेंब सुद्धा शिल्लक रहात नसून यांची पहाणी स्वत: मुख्यमंत्र्यांनी करायला हवी, अशी प्रतिक्रि या हरी देवजी वारे या ग्रामस्थांनी दिली. एवढ्या मोठ्या प्रमाणात करोडोचा खर्च होऊन देखील टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्याने तीव्र संताप येथील गावकरी व्यक्त करत आहेत. एकंदरीत गेल्या तीन वर्षांत या योजनेच्या नावाखाली २३ कोटी ३९ लाख १४ हजार रुपये खर्च होऊन देखील मोखाडा तालुक्यातील गावपाडे तहानलेलाच असल्याने जलयुक्त शिवार योजना मोखाड्यात फेल गेली असल्याचा प्रत्यय मोखाडा वासीयांना येत आहे.

पालघर जिल्ह्यातील पावसाची सरासरी २ हजार ४५८.२ असून २०१४ मध्ये २२४८.८ (९१.५ टक्के) २०१५ मध्ये १६९९.८ (६९.१० टक्के) २०१६ मध्ये ३९७३.८ 8 (११६.४ टक्के) तर २०१८ मध्ये २३२४.६ (९४ टक्के) इतका पाऊस पडला आहे. यावर्षी ऑगस्ट-सप्टेंबर दोन महिने वगळता जिल्ह्यात चांगला पाऊस झाला असताना करोडोची जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून केलेली कामे बोगस ठरली आहेत. जमिनीतील पाण्याची पातळी वाढावी सिंचन क्षेत्र वाढावे, शेतीला तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यातून स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा, कुपोषण आटोक्यात यावे, असे शासनाचे धोरण असले तरी शासन लोकप्रतिनिधींना थेंब पाणी साठवता येऊ नये ही बाब खेदाने म्हणावी लागेल. यामुळे घोटभर पाण्यासाठी होणारी पायपीट थांबलेली नाही. आज घडीला मोखाडा तालुक्यातील १०५ गावांची तहान टँकरच्या पाण्यावर भागवली जात आहे.

यामुळे मुख्यमंत्र्यांचे जलयुक्त शिवार अभियान नेमके राबविले तरी कुठे असा प्रश्न विचारला जात आहे. तालुक्यात कृषि विभागाने सीसीटी, मजगी, जु, भा, शे, द, फळलागवड , सिमेंट नाला बांध, सिमेंट वळण बंधारा, माती नाला बांध शेततळे लूज बोल्डर सिमेंट नाला बांध दुरुस्ती, माती नाला बांध दुरुस्ती, गाळ काढणे, अशा विविध कामांवर २०१५-१६ १०७७.४ लाख २०१६-१७ ४०९.६४ लाख तसेच २०१७-१८ मध्ये ४१.२३ लाख खर्च केला आहे . वनविभागाने वनतळे , वृक्ष लागवड, सीसीटी गोल, सिमेंट बंधारे, वनबंधाºयातील गाळ काढणे लूज बोल्डर स्टकचर या कामांवर २०१५-१६ ११९,३७ लाख २०१७-१७ तसेच २०१७-१८ मध्ये वनविभागाची कामेच केलेली नाहीत.लघुपाटबंधारे विभागाने गावतलाव, पक्का बंधारा, कोल्हापुरी बंधारा, गावातळे नुतनीकरण, पाझर तलाव दुरुस्ती, पक्का बंधारा दुरुस्तीच्या कामांवर ३७८.६४ लाख २०१६-१७ व २०१७-१८ या दोन वर्षात कामे झालेली नाहीत. तसेच लघुसिंचनच्या मार्फत २०१५-१६ २५३.५१ लाख खर्च झाला आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने विहिरी दुरु स्तीवर २२.५२ लाख खर्च झाला आहे.

सामाजिक वनीकरण विभागाने रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यासाठी २०१६-१७ रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यासाठी ३.१७ लाख खर्च झाला आहे . जलयुक्त शिवार अभियान माध्यमातून २०१५-१६ मध्ये मोखाड्यात ६०६ कामे करण्यात आली असून १८ कोटी ६८ लाख २९ हजार एवढा खर्च झाला आहे असून २०१६-१७ मध्ये ९१ कामे करण्यात आली असून ४ कोटी १२ लाख ८१ हजार खर्च झाला आहे तर २०१७-१८ मध्ये ९ कामांवर ५८ लाख ४ हजार खर्च झाला असून गेल्या तीन वर्षात २७ गावांमध्ये ७०७ कामांवर २३ कोटी ३९ लाख १४ हजार रु पये खर्च झाला असून एवढ्या मोठ्या प्रमाणात कोटीचा खर्च होऊन देखील आदिवासींची घोटभर पाण्यासाठी होणारी पायपीट थांबलेली नाही. याबाबत तालुका कृषी अधिकारी सूर्यवंशी यांना विचारले असता जलयुक्तची कामे तात्पुरती पाणी आडवण्यासाठी असल्याची प्रतिक्रिया त्यानी दिली.

जलयुक्त शिवार योजनेच्या कामात फक्त ठेकेदारांनी पैसे कमविले. त्यामुळे टंचाईची परिस्थिती मागील दहा वर्षात कायम आहे. आमच्या ग्रामपंचायत जलयुक्त शिवार योजनेचा मोठ्या प्रमाणत खर्च होऊन देखील आम्हाला काहीच फायदा झालेला नाही. शासनाने दुष्काळावर उपाययोजना केल्या नाहीत. येथून मध्य वैतरणाचे पाणी मुबंईला पाणी नेले जाते परंतु आमच्या लगतच्या गावांना भेटत नाही-शिवाजी कचरे, ग्रामस्थ पालघर

जिल्हा अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे जलयुक्त शिवार अभियान व्यवस्थित राबविले गेले नाही. यामुळे सरकारची ही योजना फसवी असल्याचा प्रत्यय येत आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी बांगर यांनी जेवढे लक्ष घातले तेवढे आताचे जिल्हाअधिकारी लक्ष घालत नाहीत प्रशासन लक्ष असते तर एवढ्या प्रचंड प्रमाणात खर्च झाला असताना मोखाड्यात पाणी टंचाईची बिकट परिस्थिती निर्माण झाली नसती. याबाबत अनेकवेळा पत्रव्यवहार करून देखील प्रशासन दुर्लक्ष केले जाते. जिल्हा अधिकाºयांनी सांगावं की एक तरी जलयुक्त शिवार योजनेच्या कामाची पाहणी केली आहे.- प्रकाश निकम, गटनेते, जिल्हा परिषद

मुख्यमंत्री सांगतात जलयुक्त शिवार योजना चांगली. परंतु आम्हाला कोणताच फायदा झालेला नाही. दुष्काळाच्या परिस्थितीत रोहयोची कामे मिळत नाहीत. - शंकर गोविंद भले (माजी उपसभापती)