शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

धाकटी डहाणूमध्ये पाणीबाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 4:57 AM

पंधरा-वीस दिवसांआड पुरवठा : जलवाहिनीतून झिरपणाऱ्या पाण्याने भागते तहान

शौकत शेख।डहाणू : सूर्या प्रकल्पाअंतर्गत येणाºया धामणी, कवडास, साखरे धरणांचे वरदान लाभलेल्या डहाणूवासीयांना जिल्हा परिषदेच्या पाणीपूरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे आठ, पंधरा, तसेच वीस दिवसांआड पाणीपूरवठा होत असल्याने हजारो भूमिपुत्रांना साठवून ठेवलेले गढूळ तसेच दुषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. येथील ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचे पंचायत समिती सदस्य वशीदस अंभिरे तसेच धा. डहाणूचे माजी सरपंच हरेश्वर तामोरे यांनी लोकमतला सांगितले.डहाणूच्या पश्चिम किनापट्टीवरील २६ गावांना बाडापोखरण प्रादेशिक नळपाणीपूरवठा योजनेअंतर्गत साखरे धरणांतून पाणी पूरवठा केला जातो. परंतु या योजनेला वीस, पंचवीस वर्ष झाल्याने त्याची जलवाहिनी, जलकुंभ, जिर्ण व जूनाट झाल्याने शासनाने बाडापोखरण पाणी पूरवठा योजनेच्या नुतनीकरणासाठी ४३ कोटी रूपये अनुदान मंजुर करून मार्च २०१४ ला दुरूस्तीच्या कामाला सुरूवात केली होती. परंतु अद्याप ही कामे अपूर्ण असल्याने सध्या जुन्याच जलवाहिनेने पाणी पूरवठा होत आहे. या प्रकारामुळे असंख्य गावांत तसेच खेडोपाडयात प्र्रेशरने पाणी जात नसल्याने येथील ग्रामस्थांना पूरेश प्रमाणात पाणी मिळत नाही. शिवाय अनेक गावांत आठ, दहा दिवसाने पाणी पूरवठा केला जात असल्याने ग्रामस्थांना विहिर किंवा बोअरवेलचे पाणी प्यावे लागत आहे.विशेष म्हणजे डहाणू तालुक्याच्या रेल्वेच्या पूर्व भागामध्ये मोठया प्रमाणात म्हणजेच शंभर टक्के आदिवासी लोकवस्ती असलेली गावे आहेत. येथील असणाºया धरणांच्या उभारणीसाठी शासनाने आदिवासी उप योजनेतून ४८० कोटी खर्च केले आहेत. त्यातून वसई-विरार, भार्इंदर आदी शहरी भागाची तहाण भागविली जात असतांना येथील स्थानिक आदिवासी बांधव तहाणेणे व्याकुळ होत आहे.येथील गोर गरीब आदिवासींना या धरणातील नळापणीपूरवठा योजनेव्दारे किंवा इतर मार्गाने पिण्याच्या पाण्याच्या थेंब ही मिळत नाही. डहाणूच्या बंदरपट्टी भागातील नागरिकांची अवस्था अशीच आहे. येथे दररोज पिण्याचे पाणी मिळत नसल्योन ग्रामस्थ त्रस्त आहेत. तर बाडा पोखरण योजनेचे शेवटचे गाव असलेले धा. उहाणूच्या रामपाडा, बारीवाडा, आदिवासीपाडा, माळी आळी, मधली आळी, मितनवाडी, हनुमान आळी या परिसरातील ग्रास्थांना वीस दिवसाने पाणी पूरवठा होत असल्याने ग्रामस्थ वीस दिवस साठवून ठेवलेले दुषीत, शिळे पाणी पित असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.थेंबेथेंबे घागर भरेपिण्याच्या पाण्यासाठी येथील आदिवासींना हातपंप, खोल विहिरीतून किंवा डबक्यातील गढूळ दुषित पाणी प्यावे लागत आहे. तर वाणगांव पासून थेट धरणापर्यंत राहणाºया आदिवासींना मोठ मोठ्या शहरांना, तारापूर अणुशक्ती केंद्र, एम.आय.डी.सी. रिलायन्स एनर्जी सारख्या मोठ्या मोठ्या प्रकल्पाकडे जाणाºया जलवाहिनीतून थेंब-थेंब झिरपणाºया पाणवर ताहान भागवावी लागत आहे.

टॅग्स :Damधरण