-अनिरुद्ध पाटीलडहाणू: ग्रामीण कृषी हवामान सेवा या योजनेंतर्गत कृषी हवामानावर आधारित कृषी सल्ला कोसबाड कृषी विज्ञान केंद्रातून दिला जाणार आहे. कृषी आणि पशू विभागाशी निगडित कृषीविषयक हा सल्ला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दर मंगळवारी तसेच शुक्रवारी मोबाइल एसएमएस सेवेद्वारे दिला जाणार आहे.
राज्यातील पहिले कृषी विज्ञान केंद्र डहाणू तालुक्यातील कोसबाडला असून भारतीय हवामान विभागाच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण कृषी हवामान सेवा या योजनेंतर्गत येथे कृषी हवामान शास्त्रज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार पालघर जिल्ह्याच्या आठ तालुक्यातील शेतकºयांना तज्ज्ञांमार्फत हवामानाचा अंदाज आणि त्यावर आधारित कृषी तसेच पशू सल्ला दर मंगळवारी आणि शुक्र वारी देण्यात येणार आहे. हा सल्ला या विज्ञान केंद्रातील सर्व विषय तज्ज्ञ, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ तसेच जिल्ह्यातील कृषी आणि पशूसंवर्धन विभागातील अधिकारी यांच्या समवेत चर्चा करून तयार करण्यात येत आहे. यासाठी आठ तालुक्यातील खरीप आणि रब्बी हंगामातील प्रमुख भाजीपाला, तृणधान्य, गळिताची पिके शिवाय बागायती फळ लागवड यांच्या अनुषंगाने हा सल्ला देऊन शेतकºयांच्या अडचणी सोडविण्यात येणार आहेत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकºयांनी कोसबाडच्या या कृषी विज्ञान केंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन, योजनेशी संबंधित लिखित अर्ज करून नि:शुल्क नोंदणी करायची आहे. त्यानंतर दर सोमवारी आणि शुक्रवारी हवामानावर आधारीत विविध पिकांविषयीचा सल्ला एसएमएस सेवेद्वारे दिला जाणार आहे.
दरम्यान पिकांच्या उत्पादनासंबंधी काही प्रश्न असतील तर केंद्राच्या फार्मर्स ग्रुपमध्ये सोमवार आणि गुरुवारी मांडावेत, असे आवाहन या कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने केले आहे.
वैयक्तिक एसएमएस सेवेसाठी शेतकºयांनी मोबाइल क्र मांक कृषि विज्ञान केंद्रात रजिस्टर करावा. त्यानंतर दर मंगळवारी तसेच शुक्रवारी मोबाइलच्या एसएमएस सेवेद्वारे हवामानाचा अंदाज आणि त्या अनुषंगाने पिकांविषयीचा सल्ला देण्यात येईल.- रजिवाना सय्यद, तज्ज्ञ,कोसबाड कृषी विज्ञान केंद्र